प्रियंका चोप्रा - निक घेणार घटस्फोट? चर्चांना उधाण
हॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी प्रियंका चर्चेत
मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनस वेगळे होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. प्रियंकाने सोशल मीडियावरून जोनस आडनाव हटवल्यानं चर्चा सुरू झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि सिंगर निक जोनस यांच्या नात्यात दुरावा आल्याची जोरदार चर्चा सध्या रंगत आहे.
1 डिसेंबर 2018 ला प्रियंका-निकचं लग्न झालं. लग्नानंतर प्रियंका परदेशातच स्थायिक झाली असून तिने आपलं नावही सोशल मीडियावर प्रियंका चोप्रा-जोनस असं लावायला सुरूवात केली होती. मात्र अचानक इन्स्टा पेजवरून प्रियंकाने जोनस आडनाव हटवल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मलाइकाने देखील काढलं होतं अरबाजचं नाव
मलायका अरोरा खाननेही तिचा पती अरबाज खानपासून घटस्फोट घेण्यापूर्वी तिच्या अकाउंटमधून खान हा शब्द काढून टाकला होता. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी समोर आल्याची माहिती आहे. अमेरिकन नागरिकत्व घेण्याच्या उद्देशाने अभिनेत्रीने निकशी लग्न केल्याचे बोलले जात होते.
लग्नानंतर लावलं होतं जोनस हे आडनाव
दोघांच्या घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली जात असली तरी अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लग्नानंतर अभिनेत्रीने तिचे इन्स्टा अकाउंट बदलून प्रियांका चोप्रा जोनास केले. दोघे खरोखरच वेगळे झाले आहेत की काहीतरी वेगळे आहे? अशावेळी चाहत्यांना प्रियांकाच्या प्रतिक्रियेची वाट पाहावी लागणार आहे.