मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या घटस्फोटाची चर्चा होती. प्रियंका पती निक जोनसपासून घटस्फोट घेत आहे की काय? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. या चर्चांवर दोघांनीही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण प्रियंकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. कुणालाही काहीही न बोलता प्रियंकाने या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. 


प्रियंकाचा निकसोबत रोमँटिक अंदाज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निक आणि प्रियंकाने आपला रोमँटिक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. एकीकडे घटस्फोटाची चर्चा रंगलेली असताना असा रोमँटिक फोटो पोस्ट करण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. 


फार काही न बोलता या दोघांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या दोघांमध्ये तसे कोणतेही मतभेद नव्हते हे समोर आले आहे. प्रियंकाने निकसोबत घटस्फोट घेण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र प्रियंकाने आपल्या अकाऊंटवरून जोनस हे आडनाव काढल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. 



निकने हा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, 'Happy thanksgiving everyone! Grateful for you' अशी पोस्ट लिहित त्याने प्रियंका चोप्राला टॅग केलं आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी रोमँटिक अंदाज शेअर केलाय.


काय आहे प्रकरण? 


काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जोनस हे आपल्या लग्नानंतरच आडनाव काढून टाकलं? यानंतर चर्चांना उधाण आलं. चर्चा अशा रंगल्या की, प्रियंका लवकरच घटस्फोट घेणार आहे. या अगोदर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी घटस्फोट घेण्यापूर्वी असा बदल केला होता. दाखला द्यायचं झालं तर अभिनेत्री मलाइका अरोराने घटस्फोट घेण्यापूर्वी अरबाजचे खान हे आडनाव काढून टाकले होते.