मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बॅण्ड बाजा बारातची तिच्या चाहत्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलीये. बॉलिवूडची ही देसी गर्ल अमेरिकन स्टार निकसोबत अगदी भारतीय पद्धतीने लग्नाची गाठ बांधणारे. प्रियांका चोप्रा लग्नाच्या बोहल्यावर कधी चढणार हा तिच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न...या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय. ही देसी गर्ल लग्न कधी आणि कुठे करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता लग्नाचा शुभमुहूर्त ठरलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका आणि निकचा विवाहसोहळा ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात पार पडणार आहे. हा विवाहसोहळा पारंपरिक भारतीय पद्धतीने साजरा होणार आहे. एकीकडे अनेक बॉलीवूडस्टार परदेशात जाऊन लग्नाचा बडेजाव करत असताना प्रियांकाने मात्र भारतातच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.


प्रियंकाची यासाठी पसंती आहे ती तिचं आवडतं डेस्टिनेश असलेल्या राजस्थानमधील जोधपूरला. जोधपूरच्या आलिशान राजमहालात प्रियांका आणि निकचा हा शानदार विवाहसमारंभ आयोजित करण्यात येणार आहे. प्रियांका म्हटलं की तिच्यावर फिदा असणारे आजही लाखो भारतीय चाहते आहेत. मात्र ही देसी गर्ल आता थेट अमेरिकेची सूनबाई होणार आहे. अमेरिकेत जन्मलेला निक हा लोकप्रिय गायक, संगीतकार आणि अभिनेता आहे.


सातव्या वर्षापासून निकच्या संगीतक्षेत्रातील कारकिर्दीतीला सुरूवात झाली आहे. प्रियांका आणि निकचा नुकताच साखरपुडा झाला होता. या लग्नाच्या घोषणेमुळे गेले काही दिवस सुरू असलेल्या या लव्ह स्टोरीवर आता एकदाचं शिक्कामोर्तब झालंय.