मुंबई : जगभरात प्रसिद्ध व्यक्ती म्हणून बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची खास ओळख आहे. फार काळा पासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या प्रियांकाने 'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या मध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीत पुन:पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती आपल्या मायदेशी परतली होती. सध्या प्रियंकाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच प्रदर्शित होत आहे. तिचा हा फोटो 'द स्काय इज पिंक' चित्रपटाचा फस्ट लूक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये प्रियांका बॉब हेअरकटमध्ये दिसत आहे. तर फोटोमध्ये तिने दिलेले पाऊट चाहत्यांना आकर्षित करत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या प्रियंकाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.   


'द स्काय इज पिंक' चित्रपटात प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केले आहे. चित्रपटाची कथा 'पल्मनरी फायबरोसिस' आजाराने ग्रासलेल्या प्रोत्साहनपर भाष्य करणाऱ्या आयशा चौधरी यांच्या जीवनावर आधारीत आहे. चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.