मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा लवकरच आपली 'मेमरी अनफिनिश्ड' (memoir Unfinished) पुस्तकाचं प्रकाशन करणार आहे. या पुस्तकामुळे प्रियंका चोप्रा भरपूर चर्चेत आहे. या पुस्तकात तिने एका दिग्दर्शकाबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. दिग्दर्शकाने प्रियंकाला 'ब्रेस्ट सर्जरी' करण्याचा सल्ला दिला होता. या विधानामुळे सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत प्रियंकाच्या या पुस्तकातील खुलास्यावर प्रश्न विचारण्यात आली. यावेळी उत्तर देताना प्रियंका म्हणते की, मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. पुस्तकातील कोणत्याही संदर्भावर मला कुणाला स्पष्टीकरण द्यायचं नाही. 


प्रियंकाने पुढे म्हटलं आहे की, 'मी मनोरंजन जगतातील महिला आहे. या क्षेत्रात कायमच पुरूषांची मक्तेदारी राहिलेली आहे. या ठिकाणी स्वतःच स्थान मजबूत करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. खंबीर व्हावं लागेल. येथे लोकं तुमच्यातील कमतरता सतत दाखवत असतात. तसेच यांना सतत तुमचा अपमान करून आनंद मिळतो. मी माझं काम केलं. ज्याबद्दल आता मला काहीच बोलायचं नाही.' 



मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाने आपल्या पुस्तकात एका घटनेचा उल्लेख केला आहे. 'जेव्हा प्रियंका एका दिग्दर्शकाला भेटली होती तेव्हा थोड्या गप्पा झाल्यानंतर त्याने प्रियंकाला उभं राहून गोल फिरायला सांगितलं. प्रियंकाने तसं केलंही. खूप वेळ दिग्दर्शक प्रियंकाला टक लावून पाहत होते. एकटक पाहत त्यांनी प्रियंका ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता.'



तसेच दिग्दर्शकाने प्रियंका जबडा आणि पार्श्वभाग ही ठिक करून घेण्याचा सल्ला दिला होता. जर मला अभिनेत्री बनायचं असेल तर मला या गोष्टी करायल्या हव्यात असा सल्ला देखील दिला होता. लॉस एंजिलिसमधील एका डॉक्टराला भेटण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता. या घटनेनंतर प्रियंकाला स्वतःमध्ये अनेक कमतरता असल्याचं जाणवू लागलं होतं. 


प्रियंका चोप्राचं 'अनफिनिश्ड' हे पुस्तक ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'द व्हाइट टाइगर' हा सिनेमा रिलीज होणार आहे.