Priyanka Chopra's Citadel Series :  बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) हॉलिवूडमध्ये तिचं नाव कमावलं आहे. प्रियांकानं तिच्या करिअरमध्ये खूप स्ट्रगल केलं आहे. पण आज प्रियांका ही टॉपच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दरम्यान, सध्या प्रियांका ही तिच्या 'सिटाडेल' या सीरिजमुळे चर्चेत आहे. तिची ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजचा पहिला एपिसोड शुक्रवारी 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. प्रत्येक आठवड्याला सिटाडेल या सीरिजचा एक एपिसोड प्रदर्शित होणार आहे. तर 28 एप्रिल रोजी या सीरिजचे दोन एपिसोड प्रदर्शित झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाच्या सिटाडेलला 1125 रेटिंग मिळाले आहेत. यानं तिची सीरिज ही लोकप्रियतेच्या चार्टमध्ये टॉपला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर नेटफ्लिक्सची 'स्वीट टूथ' ही सीरिज आहे. या वेबसीरिजला 669 रेटिंग मिळाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 'The Marvelous Mrs Maisel' आहे. याला 623 रेटिंग मिळाले आहे. चौथ्या क्रमांकावर 'The Diplomat' आहे. याला 572 रेटिंग मिळाले आहे. तर पाचव्या क्रमांकावर असलेल्या 'पावर' ला 533 रेटिंग मिळाले आहेत. 29 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या टॉप रॅंकिंगमध्ये सिटाडेल ही सीरिज टॉपला होती. 



सिटाडेल या सीरिजविषयी बोलायचं झालं तर या सीरिजमध्ये प्रियांकासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता रिचर्ड मॅडेन आहे. या दोघांनी गुप्तहेरची भूमिका साकारली आहे. तर या सीरिजसाठी प्रियांकाला रिचर्ड इतकंच मानधन मिळालं आहे. जे तिला या आधी कोणताही चित्रपट करताना मिळाले नव्हते. या सीरिजमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की ते दोघं अशा एजंसीसाठी काम करत असतात जे कोणत्या एका देशासाठी नाही तर जगात असलेल्या सगळ्याच देशांच्या सुरक्षिततेसाठी काम करतात. 


हेही वाचा : सेलिब्रिटींचं करिअर संपवण्याच्या आरोपावर Salman Khanने अखेर मौन सोडलं, म्हणाला 'मी दारू पिऊन...'


'सिटाडेल' विषयी विचारायचे झाले तर ही सीरिज भारतीय प्रेक्षक हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये देखील पाहू शकतात. तर ही सगळ्यात महागडी वेब सीरिज असल्याचे म्हटले जाते. या वेबी सीरिजच्या निर्मितीसाठी 236 मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले. तर या सीरिजमध्ये प्रियांका आपल्याला जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. तर प्रियांका लवकरच 'लव अगेन' आणि 'जी ले जरा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सिटाडेलनंतर प्रियांकाला 'लव अगेन' या चित्रपटासाठी अभिनेत्याच्या बरोबरीनं मानधन मिळालं आहे.