Priyanka Chopra's Daughter Malti Marie's Diwali : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही परदेशात असली तरी ती कधीच तिच्या परंपरा विसरत नाही. प्रियांका तिचा पती निक जोनस आणि लेक मालती मेरीसोबत सगळे सण साजरे करताना दिसते. मालती आता 10 महिन्यांची असून याच वर्षी जानेवारी महिन्यात तिचा जन्म झाला आहे. त्यामुळे मालतीची ही पहिली दिवाळी आहे. मालती ही तिच्या आईप्रमाणेच क्रिएटिव्ह आहे. प्रियांका चोप्रानं देखील तिच्या या दिवाळीसाठी खूप जोरात तयारी सुरु केली आहे. त्याच निमित्तानं मालतीनं सुंदर अशी रांगोळी काढली आहे. त्यांचा फोटो प्रियांकानं शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा मालतीनं काढलेल्या रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. यात एक फुलाची डिझाईन काढली असून त्याच्यात लोटसचा दिवा ठेवला आहे. याशिवाय त्यात गुलाबी रंगाची रांगोळी असून ती  मालतीनं भरली आहे. ही रांगोळी मालतीनं काढल्याचे या फोटोवर स्पष्ट होतं आहे. प्रियांकाची लेक मालतीचं हे टॅलेन्ट पाहून सगळ्यांनाच आश्चर्य झाले आहे. दरम्यान, रांगोळीचा हा फोटो शेअर करत प्रियांकानं कॅप्शन दिलं आहे की 'पहिली रांगोळी'. त्यासोबतच लाल रंगाचं हार्ट इमोटीकॉन तिनं यात दिलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मालतीची पहिली दिवाळी 


प्रियांकानं निक जोनस यांनी 2018 मध्ये लग्न केलं. तर जानेवारी 2022 मध्ये सरोगसीच्या मदतीनं प्रियांका आणि निकनं मालती मेरीला जन्म दिला. प्रियांका लग्न केल्यानंतर परदेशात सेटल झाली असली तरी देखील ती भारताला आणि तिच्या परंपरेला विसरलेली नाही. प्रियांका तिच्या लॉस एंजेलिनसच्या घरी सगळे हिंदू सण साजरा करताना दिसते. 



प्रियांकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'सिटाडेल 2' मध्ये दिसणार आहे. याशिवाय अशी चर्चा आहे की फरहान अख्तरच्या 'डॉन 3' मध्ये देखील प्रियांका दिसण्याची शक्यता आहे. प्रियांकानं 'डॉन: द चेस बिगिन्स' आणि 'डॉन 2' या दोन्ही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, 'डॉन 3' मध्ये शाहरुख नाही तर त्याच्या ऐवजी रणबीर सिंग दिसणार आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. प्रियांकाच्या चाहते नेहमीच तिची विनंती करताना दिसतात की तिनं आता हिंदी चित्रपटसृष्टीत काही तरी काम करायला हवं, त्यांना तिला पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना पाहायचं आहे.