Priyanka Chopra's Mother Madhu Trolled : बॉलिवू़ड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करते. तिचा फॅशन सेन्सतर अनेक लोक फॉलो करतात. फक्त प्रियांका नाही तर प्रियांकाची आई देखील तितकीच चर्चेत असते. सध्या प्रियांकाची आई मधू चर्चेत येण्याचं कारण हे त्याचे कपडे आहेत. खरंतर, प्रियांका चोप्राची आई मधू चोप्राचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत असलेला त्यांचा आऊटफिट हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे मधू यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका चोप्राची मधू यांचा हा व्हिडीओ व्हूम्पला या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत मधू यांनी एक ट्रान्सपरंट टॉप आणि ट्राऊजर परिधान केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ एका बूक लॉन्च कार्यक्रमातील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी त्यांना ट्रोल करत म्हटले की त्यांची मुलगी अभिनेत्री आहे त्या नाही याची जाणीव त्यांना नाही वाटतं असं देखील म्हटलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ट्रोलर्सच्या निशाण्यावर


मधू यांच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'फॅशनोवा मम्मी.' दुसरा नेटकरी त्यांच्या वयावरून त्यांना ट्रोल करत म्हणाला, 'प्रियांकाची आई, तुम्ही अशा प्रकारच्या ड्रेससाठी खूप वयस्कर आहात.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'उर्फीची आजी आहे वाटतं ही.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'प्रियांका तू पाहिलंस का तुझ्या आईनं काय परिधान केलं आहे.' 


हेही वाचा : KBC15 : वर्ल्ड कपवरील सोप्या प्रश्नाचं उत्तर चुकलं अन् घरी घेऊन गेली फक्त 10 हजार! तुम्हाला माहितीये का अचूक उत्तर


नेटकऱ्यांनी घेतली मधु यांची बाजू


तर काही नेटकऱ्यांनी मधू यांची बाजु घेतली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'फ्लॅश लाईटमुळे त्यांची ब्रा दिसत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'त्यात काही वेगळं नाही आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'मला यात काहीही चुकीचं वाटतं नाही आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'त्यांच्या लक्षात आलं नसेल कारण त्या नेहमीच व्यवस्थित कपडे परिधान करतात. यात त्यांची काही चूक नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'त्या स्वत: एक डॉक्टर आहेत आणि त्यांची लेक ही लोकप्रिय अभिनेत्री. त्यांच्या जागी पोहोचण्याचा तुम्ही विचारही करू शकत नाहीत. मग त्यांच्या विरोधात बोलून काय मिळणार आहे.'