मुंबई : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा आणि बॉलिवूडची पीसी. माजी मिस वर्ल्ड प्रियांकाने तिच्या अभिनयाने सर्वांच्या वाहवाह मिळवल्या. प्रियंकाने तिच्या करियरमध्ये अनेक अव्हानात्मक भूमिका अगदी योग्य पद्धतीत प्रेक्षकांसमोर सादर केल्या. तिच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातचं नाही तर संपूर्ण जगभरात मोठी आहे. नेहमी चर्चेत असणारी ही अभिनेत्री कायम तिच्या अदांमुळे  चाहत्यांना घायाळ करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताचं  निक जोनसला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निकला सेटवर काही इजा झाल्यामुळे त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं आहे. पती रूग्णालयात असून सुद्धा प्रियंकाने सोशल मीडियावर निकसोबत फोटो पोस्ट केले आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 



प्रियंकाने निकसोबत फोटो पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. 'पतीचं कौतुक करण्यासाठी पोस्ट... इजा झाली तरी निसर्गाची ही शक्ती तुला थांबवू शकत नाही. मला तुझ्यावर गर्व आहे. तु जे काही करशील ते मला रोज प्रेरणा देणारं आहे. मी तुझ्यावर प्रेम करते..'


प्रियंकाने बोल्ड अंदाजातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियंकाने आता जे फोटो पोस्ट केले आहेत ते फोटो  बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्ड्सचे असल्याचं सांगितलं जात आहे. कही फोटोमध्ये प्रियंका एकटी दिसत आहे, तर फोटोंमध्ये तिच्यासोबत पती निक जोनस देखील दिसत आहे.