``एवढ्या लवकर हे उपदव्याप``, प्रियंका दहावीत असताना कपाटात अशा वस्तू लपवत होती..
बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास करणारी देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच तिचं ``अनफिनिशड`` हे पुस्तक लाँन्च केलं.
मुंबई : बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास करणारी देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच तिचं ''अनफिनिशड'' हे पुस्तक लाँन्च केलं. या पुस्तकात प्रियंकाने तिच्या आयुष्यातील अनेक अनुभव शेअर केले आहेत. यातलाच एक किस्सा म्हणजे जेव्हा ती दहावीत शिकत होती आणि तिच्या बॉयफ्रेंन्डबरोबर तिला पकडलं गेलं होतं.
कपाटात लपवलं होतं बॉयफ्रेंन्डला
प्रियंकाने आपल्या पुस्तकात सांगितलं आहे की, ''जेव्हा मी दहावीत होते तेव्हा मी बॉब नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली होती. त्यावेळी मी अमेरिकेत आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती. एक दिवस बॉब आणि मी घरात हातात हात घालून टीव्ही पाहत होतो. अचानक मी खिडकीच्या बाहेर पाहिलं. तेव्हा मला मावशी पायर्या चढत आत येताना दिसली.
मला भीती वाटायला लागली. दुपारचे दोन वाजले होते. तिच्या येण्याचा हा नेहमीचा वेळ नव्हता. बॉबला बाहेर जाण्यासाठी काहीच मार्ग नव्हता आणि आम्ही दोघंही माझ्या खोलीकडे पळत सुटलो. मी त्याला कपाटात लपायला सांगितलं.
मावशीने कपाट उघडलं
प्रियंकाने पुस्तकात पुढे लिहिलं आहे की, 'मी मावशीला जो पर्यंत किराणा दुकानात पाठवणार नसते तोपर्यंत ती तिथेच राहिली असती. मावशी घरात शिरली आणि प्रत्येक खोलीत काळजीपूर्वक पाहू लागली. मी माझ्या बेडवर बायोलॉजीचं पुस्तक घेवून अशी बसली होते, जेणेकरुन तिला वाटेल की, मी अभ्यास करत आहे.
ती माझ्या खोलीच्या उंबरठ्यावर आली आणि म्हणाली 'हे उघड' मी मावशीला विचारलं 'काय उघडू' मावशी म्हणाली, 'तुझं कपाट उघड. ''मी घाबरले होते, कारण यापूर्वी मी माझ्या मावशीचा असा राग कधीच पाहिला नव्हता. मी कपाटाचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक मुलगा बाहेर आला.
मावशीने माझ्या आईला बोलावलं आणि म्हणाली, 'यावर माझा विश्वास बसत नाही आहे की, प्रियांका माझ्यासोबत खोटं बोलली. तिच्या कपाटातून एक मुलगा बाहेर आला होता.'
यानंतर प्रियंका अमेरिकेतून परत इंडियामध्ये आली आणि मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभागी झाली. यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. मॉडेलिंगपासून बॉलिवूड आणि त्यानंतर हॉलिवूडच्या प्रवासात प्रियंकाला लाखो करोडो चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं.