मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रियांका ही नेहमीच तिच्या कामात व्यस्त असली तरी देखील ती कुटुंब आणि मुलगी मालती मेरीसाठी नक्कीच वेळ काढते. या रविवारी प्रियांकानं तिच्या लेकीसाठी पूर्ण वेळ काढला. मुलीचा एक खास फोटो प्रियांकानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की प्रियांकाची लेक मालती तिच्या धाकट्या आजीच्या कुशीत घेतले आहे. यात मालतीनं कलरफूल ड्रेस परिधान केला आहे. या फोटोत ती सुंदर दिसत आहे. या दरम्यान, मालतीचा चेहरा दिसत नाही आहे. हा फोटो शेअर करत प्रियांकानं लव्ह यू छोटी आजी असं कॅप्शन दिलं आहे. 



काही दिवसांपूर्वीच प्रियांकानं तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला. त्यांनी समुद्रकिनारी पार्टी केली, यावेळी कुटुंबातील काही सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले होते.  


दरम्यान, प्रियांकाचे अनेक प्रोजेक्ट्स हे लाइनअप आहेत. 'It's All Coming Back To Me' आणि 'Citadel' ही सीरिज आहे. तिच्याकडे एक बॉलीवूड चित्रपट देखील आहे, या चित्रपटाची निर्मिती ही फरहान अख्तर करत आहे. या चित्रपटाचे नाव 'जी ले जरा' असून यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याही भूमिका आहेत.