`या` लोकप्रिय कॉमेडियनला मलालाची खिल्ली उडवणं पडलं महागात, प्रियंका चोप्रानं दिलं सडेतोड उत्तर
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
मुंबई : कॉमेडियन हसन मिन्हाजला नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझईची (Malala Yousafzai) खिल्ली उडवणं महागात पडल आहे. मलालाची मैत्रिण आणि भारताची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) हसन मिन्हाजचा (Hasan Minhaj ) चोख उत्तर दिल आहे. हसन मिन्हाजनं अलीकडेच एक स्टँडअप व्हिडिओ शेअर केला होता त्यात तो म्हणाला होता की मलाला इन्स्टाग्रामवर त्याला फॉलो करते, परंतु तो तिला फॉलो करत नाही. यानंतर मलालानं हसनला अनफॉलो केलं. आता प्रियांकानंही हसनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करून मलालाला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर प्रियांकानं हसन मिन्हाजला 'छोट्या विचारांचा' माणूस म्हणून वर्णन केलं आहे.
हेही वाचा : वर्षभरापूर्वी साखरपूडा, काही महिन्यांपूर्वी लग्न रद्द; जाणून घ्या वैशाली ठक्कर विषयी 'त्या' गोष्टी
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ही हसन मिन्हाजच्या इन्स्टाग्राम पोस्टनं झाली. हा नवीन व्हिडिओ शेअर करत हसननं लिहिले, "गोष्टी आता हाताबाहेर जात आहेत..." व्हिडिओमध्ये हसन म्हणतो, '4 ऑक्टोबरला मी नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझईची खिल्ली उडवली. मी म्हणालो की ती मला इन्स्टाग्रामवर फॉलो करते आणि मी तिला फॉलो करत नाही. त्यानंतर तिनं मला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. मला माफ करा, मला फॉलो करा. जरी मला माहित नाही की मी तुला फॉलो करेन की नाही. मी तितका छोटा माणूस आहे.'
प्रियंकानं हसन मिन्हाजच्या या व्हिडिओवर सडेतोड उत्तर देत मैत्रिण मलालाला पाठिंबा दिला आहे. प्रियांकानं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये तिनं हसन मिन्हाजला अनफॉलो केलं आणि हसन तिला फॉलो करताना दिसत आहे. प्रियांकानं या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कॅप्शननं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Priyanka Chopra Slams And Unfollows Hasan Minhaj Supports Malala Yousafzai Know Everything)
मात्र, हसन मिन्हाजवर प्रियंका चोप्राचा राग काही नवीन नाही. कॉमेडियनने त्याच्या एका स्टँडअप दरम्यान प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाची खिल्ली उडवली. त्याने प्रियांकाच्या लग्नाला खोटं म्हटले होते. विशेष म्हणजे आता हसन मिन्हाजही ट्विटरवर ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांनी मलालाला पाठिंबा दिला आहे.
मलालाने हसनची पोस्टही शेअर केली दरम्यान, मलाला युसुफझईनेही हसन मिन्हाजची व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत मलालाने लिहिले की, 'ज्यांनी मला हे पाठवले त्या सर्वांचे आभार कारण मी आता त्याला फॉलो करणार नाही.'