मुंबई : केवळ हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील महिला अभिनेत्रींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. ही खळबळजनक माहिती दिलीय ख्यातनाम सिने अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलिवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनवर सध्या लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होतोय. त्याच्या विरोधात हॉलिवूडमधून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत.


अँजेलिना जोली, जेनिफर लॉरेन्स, रीझ विदरस्पून, ग्वेनेथ पॅल्ट्रो या अभिनेत्रींनी हार्वेवर टीका केलीय.


भारतातही असा हार्वे वेन्स्टाइन आहे का? असा प्रश्न अलिकडेच प्रियांका चोप्राला विचारण्यात आला. तेव्हा बॉलिवूडमध्ये एकच हार्वे वेन्स्टाइन नाहीये. असे हार्वे सगळीकडेच असतात, असं तिनं सांगितलं.



दरम्यान, हार्वेची ऐश्वर्या रायवर देखील कशी वाईट नजर होती, याचा खुलासा ऐश्वर्याची आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक सिमोन शेफील्डनं केला आहे.