मुंबई : सिक्कीमबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रियांका चोप्रानं माफी मागितली आहे. सिक्कीम हे दहशतवाद प्रभावित राज्य असल्याचं वक्तव्य प्रियांका चोप्रानं टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये केलं होतं. प्रियांका तिनं प्रोड्यूस केलेला चित्रपट 'पहुना'च्या प्रमोशनसाठी या फेस्टिव्हलला गेली होती, तेव्हा तिनं हे वक्तव्य केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिक्कीमबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रियांकावर सोशल नेटवर्किंगवर जोरदार टीका झाली होती. सिक्कीम एक शांत राज्य आहे, इकडे कोणताही दहशतवाद नाही, असं प्रत्युत्तर प्रियांकाला सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी दिलं होतं.


सिक्कीम हा भारताचा असा भाग आहे जिकडे फिल्म इंडस्ट्री नाही. इथल्या नागरिकांनी चित्रपट बनवला नाही. पहुना या भागातील चित्रपट आहे. सिक्कीममध्ये खूप दहशतवाद आहे आणि इथली परिस्थिती अडचणीची असल्याचं प्रियांका चोप्रा ईटी कॅनडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाली होती, पण वाद वाढत चालल्यावर अखेर तिनं माफी मागितली आहे.


पहुना हा सिक्कीमचा पहिला चित्रपट असल्याचं प्रियांका म्हणाली आहे. पाखी टायरवालानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दोन नेपाळी मुलांबद्दल हा चित्रपट आहे.