मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासचा हजारजवाबीपणा प्रसिद्ध आहे. ती सध्या लंडनमध्ये तिच्या आगामी 'सिटाडेल' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. दरम्यान, तिने आपला शानदार सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात एका युजरने तिच्या हेअरस्टाईलबद्दल तिची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. पण प्रियंकाच्या उत्तराने युजरचं बोलणं बंद झालं आणि वाचकांच्या चेहऱ्यावर हास्यही आणलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकाचा लूक 
हा फोटो प्रियांका चोप्रा जोनासने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती न्यूड मेकअप, पांढरा ड्रेस आणि मोकळ्या केसांमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, 39 वर्षीय अभिनेत्याने 'सिटाडेल' आणि 'सेल्फीमोड' हे हॅशटॅग वापरून आपल्या चाहत्यांना सांगितलं की, तो या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. हा पाहा फोटो


मेकअप आर्टिस्टने केलेली मजेदार कमेन्ट
मेकअप आर्टिस्ट पॉल गूचने प्रियांकाच्या पोस्टवर स्माईल इमोजीसोबत कमेंट केली आहे, 'तुमची हेअरस्टाईल कोणी केली? ही हेअरस्टाईल सुंदर आहे. 'याला प्रियांकाने उत्तर देत, 'हाहाहा मजेदार माणूस, हेअरस्टाईलसाठी धन्यवाद.' आता प्रियांकाच्या कमेंन्टवरून असं दिसत आहे की, गूचने तिची हेअरस्टाईल केली आहे. लोक या दोघांच्या संभाषणाचा खूप आनंद घेत आहेत. 



पती निकने केलं कौतुक 
प्रियंकाच्या या फोटोवर चाहत्यांपासून ते तिचा पती निक जोनासपर्यंत अनेकांनी फोटोवर कमेंटचा वर्षाव केला. निक जोनासने पत्नी प्रियांकाच्या या सुंदर फोटोवर लिहिलं की, 'तू हॉट आहेस' यासोबत त्याने हार्ट इमोजीही दिले आहेत. हे फोटो समोर आल्यापासून प्रियांकाचं इन्स्टाग्राम अकाउंट कमेंट्सने भरलं आहे.