मुंबई : सौंदर्य स्पर्धा या मॉडेल्सच्या बुद्धिमत्ता आणि त्यांच्या विचारावर Judge केला जातो. पण आता चर्चा सुरु झाली आहे की सौंदर्य स्पर्धां या बुद्धिमत्तेवर किंवा त्यांच्या विचारांवर Judge केली जात नाही तर त्यात फसवाफसवी केली जाते, असा आरोप काही माजी मीस वर्ल्ड स्पर्धकांनी केला आहे. मग आता हे सत्य आहे की असत्य हा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान. हे आरोप कोणी आणि का केले असा प्रश्न तुमच्या समोर आला असेल. दरम्यान, मिस USA स्पर्धेत मिस टेक्सास आर बोनी गॅब्रिएलच्या (R'Bonney Gabriel)  विजयानंतर बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अचानक चर्चेत आली आहे. 2000 सालात झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धक Leilani McConney नं प्रियंका चोप्रावर धक्कादायक आरोप केले होते. Leilani McConney ही त्यावेळची मिस बार्बाडोस आणि सध्या एक यूट्यूबर आहे. Leilani McConney एक व्हिडीओ शेअर करत म्हणाली की, 'त्यावेळी मिस वर्ल्ड स्पर्धा ही फिक्स करण्यात आली होती आणि सर्वांना माहित होते की प्रियांका चोप्रा जिंकणार आहे.' 


प्रियांकावर Leilani McConney वर केलेत हे आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिस टेक्ससमध्ये कसा भेदभाव केला यावर Leilani McConney म्हणाली, 'मिस वर्ल्ड स्पर्धेत मी नेमका याच गोष्टीचा सामना केला.' त्यावेळचे फोटो आणि बातम्यांचे कटिंग्ज शेअर करत Leilani McConney म्हणाली, 'मी मिस बार्बाडोस होते आणि मिस वर्ल्डमध्ये गेले होते आणि ज्या वर्षी मी गेले तेव्हा मिस इंडिया ही स्पर्धा जिंकली. त्या वर्षी सर्व स्पॉन्सरशिप हे भारतीयाचे होते.'


Leilani McConney म्हणाली, 'एका भारतीयानं संपूर्ण मिस वर्ल्ड स्पर्धेला स्पॉन्सर केलं होतं. आज मला त्यावेळी प्रियांका चोप्राच्या फेवरेटिज्मविषयी आठवलं की एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे तिला एक ड्रेस परिधान करत स्विमसूट राऊंड पार केला होता. तिचा स्किनटोन हा एकसारखा दिसायला हवा म्हणून क्रीम वापरण्यास परवानगी दिली, म्हणजे तिच्या त्वचेचा रंग एकसारखा दिसेल. मी असं नाही म्हणतं की कोणती ब्लीज क्रीम होती, ही एक स्किन टोन क्रीम होती.


Leilani McConney शेअर केलेला व्हिडीओ पाहा 



Leilani McConney म्हणाली, 'ही क्रीम प्रियांकाला सूट करत नव्हती, आणि आता तिला तिचा ड्रेस काढायचा नव्हता. यामुळेच जेव्हा रिझल्ट आला तेव्हाही तिने तो ड्रेस परिधान केला होता. कोणालाही ती आवडली नव्हती, इतकंच काय तर आणि कोणाला चांगली वागणूक देत नव्हती. प्रियंका स्पर्धा जिंकण्याआधीच तिचे फोटोशूट समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आले होते, तर इतर सर्वांचे ग्रुप फोटोशूट वाळूच्या खड्ड्यात केले होते. इतर मुली जेवणासाठी एकाठिकाणी एकत्र यायच्या तर प्रियांकाला तिच्या बेडवर जेवण मिळायचं.' 


Leilani McConney जेव्हा प्रियांका जिंकली तेव्हा स्पर्धा Unfair असल्याचे सगळ्यांना वाटले आणि त्यांनी स्टेजवरून वॉक आउट केले. मिस वर्ल्डमध्ये प्रियांका जिंकणार हे सर्वांना माहीत होते आणि त्यात हेराफेरी करण्यात आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेळी ब्युटी पेन्जेंटचा भाग असलेल्या अनेक स्पर्धकांनीही या व्हिडिओला पाठिंबा दिला आहे.