मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा हीने हॉलिवूडमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही भलतीच अॅक्टिव्ह असते. दररोज ती नवनवे फोटोज शेअर करत असते. नुकताच तिने  'थॅंक्स गिव्हिंग डे' सेलिब्रेट केला. यानिमित्ताने तिने तिच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. 



या पार्टीसाठी तिने स्वतः काही पदार्थ बनवले. ते बनवत असताना किचनमध्ये केलेल्या मजामस्तीचा व्हिडिओ तिने शेअर केला. त्यात ती भाजी चिरताना दिसत आहे. तो व्हिडिओ शेअर करताना तिनं लिहिलंय की, विश्वास बसत नाही, मी भाजी चिरतेय. 
या पार्टीत प्रियंकाने आपल्या फ्रेंड्ससोबत खूप धमाल केली, हे तिने शेअर केलेल्या फोटोतून कळतंय.