प्रियांकाच्या `या` ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही चकीत व्हाल !
देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आता फक्त बॉलिवूड स्टार राहिलेली नसून ग्लोबल स्टार झाली आहे.
मुंबई : देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आता फक्त बॉलिवूड स्टार राहिलेली नसून ग्लोबल स्टार झाली आहे. आपला दमदार अभिनय आणि आत्मविश्वास याच्या बळावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवली आहे. अभिनयाबरोबरच तिची आणखी एक जमेची बाजू म्हणजे तिचा स्टाईल सेन्स. तिचं स्टायलिश राहणीमानाची मोहिनी अनेकांवर पडली आहे. कोणत्याही कार्यक्रमात तिच्या हटके स्टाईलने ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते.
‘ऑस्कर’ आणि ‘एमी’ पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अवतरताना तिने परिधान केलेल्या ड्रेसनंतर आता ‘युनिसेफ’च्या (UNICEF) कार्यक्रमातील तिच्या ड्रेसची सर्वत्र चर्चा होत आहे. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे या ड्रेसची किंमत.
‘युनिसेफ’द्वारा आयोजित केलेल्या ‘ग्लोबल गोल्स अवॉर्ड्स २०१७’ मध्ये प्रियांकाने क्रिस्टियन सिरियानोच्या कलेक्शनमधील सुंदर पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. मात्र या ड्रेसची किंमत तुम्हाला माहित आहे का? ४५०० डॉलर म्हणजेच २,८९,७८० रुपये. ही किंमत ऐकून नक्कीच तुमचे डोळे विस्फारले असतील. यावरून सेलिब्रिटींच्या महागड्या आवडीनिवडींचा अंदाज येतो.