नवी दिल्ली : बॉलिवूड प्रोड्युसर करीम मोरानीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर तो आज सकाळी पोलिसांसमोर हजर झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोरानीनं दामिनी, राजा हिंदुस्तानी, रावन, दिलवाले, चेन्नई एक्सप्रेस यांसारखे सिनेमांची निर्मिती केलीय. 


२०१५ मध्ये दिल्लीच्या एका महिलेवर मुंबई आणि हैदराबादमध्ये वारंवार बलात्कार केल्याचा आरोप मोरानीवर आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात पीडितेनं मोरानीनं आपल्यावर बलात्कार केल्याचं सांगत पोलिसांत धाव घेतली होती. मोरानीवर ४१७ (फसवणूक), ३७६ (बलात्कार), ३४२ (जबरदस्तीनं डांबून ठेवणं), ५०६ (धमकी) असे गुन्हे दाखल करण्यात आलेत. 


पीडित महिला बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंटची विद्यार्थिनी आहे. आपल्याला अनेकदा ड्रग्ज देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचं... आणि मारण्याच्या धमकीसहीत अश्लील फोटो लीक करण्याची धमकी देऊन वारंवार ब्लॅकमेल केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे.


मोरानी हा सिनेयुग प्रोडक्शनचा संस्थापक आहे आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा जवळच्या वर्तुळातला मानला जातो. मोरानी टूजी स्कॅममधला एक आरोपी आहे.