मुंबईत चित्रीकरणावर बंदी घातल्यानंतर निर्मात्यांचा मोठा निर्णय
चित्रपट, मालिका, वेबसीरिजच्या चित्रीकरणावर बुधवारपासून बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूच वाढत संसर्ग पाहाता राज्य करकारने काही नियम अधिक कठोर केले आहेत. या नियमांमध्ये चित्रपट, मालिका, वेबसीरिजच्या चित्रीकरणावर बुधवारपासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कलाकारांनी गोव्याची वाट धरली आहे. मुंबईत चित्रीकरणस बंदी घातल्यानंतर निर्मात्यांनी गोवा राज्यात चित्रीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी गोव्यात चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी देणारी नोडल एजन्सीनेही निर्मात्यांना राज्यात परवानगी न घेता शूटिंग करण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटाचे कलाकार आमि दिग्दर्शक मोहित सूरी गोव्यात याआधीच पोहोचले. पण गेल्या दोन दिवसांपासून गोव्यात कलाकारांनी आणि अन्य निगडीत लोकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीमुळे गोवा प्रशासनही सतर्क झाले आहे. अशा परिस्थितीत गोव्यातील चित्रपटाच्या चित्रीकरणावर देखरेख ठेवणारी गोव्यातील एन्टरटेन्मेंट सोसायटीने स्पष्टीकरण दिले आहे की गोवा राज्यात त्यांच्या कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय शूट करणे बेकायदेशीर आहे.
8 एप्रिल रोजी एन्टरटेन्मेंट सोसायटीने आदेश देत गोव्यात चित्रीकणार करण्यास ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, गोव्यात चित्रपट, मालिका, वेबसीरिजचं चित्रीकरण करत असाल तर त्याची संपूर्ण माहिती एन्टरटेन्मेंट सोसायटीला देण बंधनकारक असल्याचं देखील सोसायटीने सांगितलं आहे.