मुंबई : अभिनेता डिनो मोरिया आणि कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या कोटींच्या मालमत्तांवर यांच्या संपत्तीवरही ईडीने कारवाई केली आहे.14,500 कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्यासंदर्भात खटला दाखल झाला आहे. आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या ईडी नुसार या प्रकरणातील मनी लाँडरिंगच्या चौकशीत संदेसरा बंधु आणि इरफान सिद्दीकी यांच्यातील आर्थिक व्यवहार झाल्याचं उघडकीस आलं आहेत. तसंच, डिनो मोरिया देखील यात सामील असल्याचं उघड झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडी सूत्रांनी सांगितलं की, ज्या व्यवहारांना गुन्हेगारीची रक्कम समजली जाते, त्या व्यवहारात समान मूल्याची मालमत्ता जोडली गेली आहे. स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे प्रवर्तक असलेले नितिन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दीप्ती संदेसरा आणि हितेश पटेल हे सध्या फरार असून त्यांनी कर्ज घोटाळ्यातून मिळालेली संपत्ती काही निवडक लोकांकडे सोपवली होती. याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.


ईडीच्या माहितीनुसार डिनो मोरिया आणि डीजे अकीलला ही संपत्ती २०११ आण २०१२ मध्ये सोपवण्यात आली होती. दोघांनीदेखील संदोसरा बंधुंकडून आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी हा व्यवहार झाल्याचं समोर आलंय. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी डिनो मोरिया आणि डिजे अकीलला काही पैस देण्यात आले होते. 


पीएमएलए कायद्याअंतर्गत या चारही लोकांच्या संपत्तीच्या जप्तची कारवाई सुरु करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. एकूण ८.७९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. यात अभिनेता संजय खानची ३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर डिनो मोरियाची १.४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात येत आहे. डीजे अकीलच्या १.९८ कोटी तर इरफान सिद्दीकी यांच्या २.४१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. गुजरात मधील एका औषध कंपनीचे संदेसरा बंधु मालक आहेत.