Pune Goldman Sunny Waghchaure : पुण्याचा गोल्डन बॉय सनी नानासाहेब वाघचौरेनं (Sunny Waghchaure) बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घरात वाइल्ड कार्ड म्हणून एण्ट्री केली आहे. सनीनं सलमानच्या घरात एण्ट्री केल्यानंतर त्याच्या विषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सनीच्या विरोधात मानसिक छळ, शारीरिक छळ आणि गर्भपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसाठी छळ केल्याचा आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


वाचा सनीच्या पत्नीनं कोणते आरोप केले आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनीसोबत त्याच्या कुटुंबातील इतर चार जणांवर त्याच्या पत्नीनं आरोप केले होते. सनीच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीनुसार, '23 मार्च 2011 ते 22 ऑक्टोबर 2020 या काळात नेहरू नगर येथील संतोषी माता मंदिर चौकाजवळील माझ्या घरात माझ्यावर अत्याचार आणि कौटुंबिक छळ करण्यात आला. सनी नाना वाघचौरे, आशा नाना वाघचौरे, नाना वाघचौरे आणि मेहुणी नीता गायकवाड हे चार जण यात सहभागी आहेत. सनीसह वाघचौरे कुटुंब सातत्यानं माझ्या आई-वडिलांकडं घरात लागणाऱ्या वस्तूची मागणी करायचे.'



पुढे आरोपात त्याची पत्नी म्हणाली की 'तो बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेऊन मला मारहाण करत. शिवीगाळ करुन धमकीही द्यायचा. इतकंच नाही तर सनीसोबत सासरच्या इतर काही लोकांकडूनही अनेक वेळा माझा छळ करण्यात आला आहे. सनी वाघचौरेसोबत त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला गर्भपाताची औषधं देत गर्भपात केल्याचा आरोपही तिनं केला. तसेच संपूर्ण वाघचौरेच्या कुटुंबियांकडून मला पट्ट्यानेही मारहाण करण्यात आली होती', असे तिनं या तक्रारीत म्हटलं होते. (Pune Goldman Sunny Waghchaure s Wife Made Serious Allegations On him) 


हेही वाचा : सुपरस्टार Rajinikanth यांच्यासोबत 'ती' रिलेशनशिपमध्ये? पण तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम...


गोल्डन बॉय सनीच्या पत्नीनं केलेल्या तक्रारीनंतर त्याच्या आणि आशा नाना वाघचौरे, नाना वाघचौरे आणि नीता गायकवाड या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या सनी हा बिग बॉस हिंदीमध्ये आहे. बिग बॉसचे हे 16 वे पर्व सुरु आहे. मात्र 'बिग बॉस 16' मध्ये आधीपासूनच एक स्पर्धक आहे जो त्याच्यासारखाच आहे. आम्ही बोलत आहोत एमसी स्टेनबद्दल, ज्यांच्या गळ्यातल्या गोल्डवरुन सलमान खाननेही त्याला अनेकदा विचारलं आहे. इतकंच नाही तर स्टेनच्या शूजलाही शोमध्ये हायलाइट करण्यात आलं आहे. पण आता या बाबतीत गोल्डन बॉय आणि स्टेनमध्ये चांगलीच टक्कर होऊ शकते. दोघांना आमने-सामने पाहण्यासाठी चाहतेही कमालीचे उत्सुक आहेत. सनी हा स्वत: एक सेलिब्रिटी असून अनेक सेलिब्रिटींना देखील ओळखतो.