Silk Smitha Birthday : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा (Vidya Balan) 'डर्टी पिक्चर' (Dirty Picture) सगळ्यांच्या चांगलाच लक्षात आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता (Silk Smitha) यांच्या आयुष्यावर आधारित होता. त्यांचा मृत्यू कसा झाला याचं गूढ अजूनही समोर आलेला नाही. 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्र प्रदेश राज्यातील कोव्वाली येथे त्यांचा जन्म झाला होता. सिल्क स्मिता याचं आधीचं नाव विजयालक्ष्मी वादलापति होतं. सिल्क स्मिता यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. बऱ्याच वेळा सिल्क स्मिता या असंच ऑडिशनला जायच्या. त्या आधी त्यांनी कधी कोणाला अभिनय करताना पाहिले नव्हते. असे देखील म्हटले जाते की ऑडिशनला जाताना अभिनय कसा करायचा हे त्या सेटवरच शिकल्या.
1979 मध्ये मल्याळम चित्रपट निर्माते अँथनी यांनी विजयालक्ष्मी यांना पाहिले आणि त्यांचे सिल्क स्मिता हे नाव ठेवले. अँथनीच्या 'Inaye Thedi' या चित्रपटात सिल्क स्मिता यांनी सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. यानंतर अनेक छोटे-मोठे चित्रपट केल्यानंतर सिल्क स्मिता यांना सेक्स सिम्बॉल अशी ओळख मिळाली. यानंतर सिल्क स्मिता यांनी मागे वळून पाहिले नाही. एकापाठोपाठ एक सिल्क स्मिता यांनी दोन वर्षांत 400 चित्रपट केले. सिल्क स्मिता यांच्यामुळे न चालणारे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू लागले होते.
सिल्क यांचे इतके चाहते होते की चित्रपटात दोन मिनिटांचा सीन असला तरी तिला पाहण्यासाठी लोक तिकिट खरेदी करायचे. त्या काळात त्यांना एका गाण्यासाठी किंवा मग सीनसाठी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त मानधन मिळायचे. सिल्क स्मिता यांनी कमल हासन, रजनीकांत यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. रजनीकांत यांच्यासोबत त्यांचं रिलेशनशिपमध्ये असल्याची देखील चर्चा होती. एवढंच काय तर अशी देखील चर्चा होती की रजनीकांत हे सिगारेटं सिल्क स्मिता यांच्या शरीरावर खुणा करायचे.
हेही वाचा : 'कर्म तुम्हाला सोडणार नाही..', Malaika Arora च्या प्रेग्नंसीच्या बातमीवर अर्जुनचा संताप
सिल्क स्मिता यांना प्रसिद्धी तर मिळाली पण त्यांना कधीच खरं प्रेम मिळालं नाही. लहान असताना गरिबीमुळे त्यांच लग्न करण्यात आलं होतं. पण सतत होणाऱ्या छळाला कंटाळून सिल्क स्मिता या पळून आल्या होत्या. त्यांच्या बोल्ड इमेजमुळे अनेक अफेअर्स असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्या कधीच विवाह बंधनात अडकल्या नाही. तर असे देखील म्हटले जाते की त्यांना एकाच भूमिकेत पाहून प्रेक्षक कंटाळले होते, त्यामुळे त्यांना काम मिळत नव्हतं. काम मिळत नाही म्हणून सिल्क स्मिता या प्रॉडक्शनकडे वळल्या होत्या. सिल्क स्मिता यांनी चित्रपटाची निर्मिती केली पण यात त्यांना यश मिळाले नाही. कुठेच काही होत नाही याच्या टेन्शनमध्ये सिल्क स्मिता यांना दारुचे व्यसन लागले होते.
23 सप्टेंबर 1996 रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्याच घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी खरंच आत्महत्या केली की त्यांचा कोणी खून केल्याचा पुरावा मिळाला नाही. तर सिल्क स्मिता यांनी तेलगूमध्ये सुसाईड लेटरही लिहिले होते, पण या पत्रानं देखील त्यांच्या आत्महत्येचं गूढ समोर आलं नाही.