मुंबई: साऊथचा प्रसिद्ध अभिनेता पुनित राजकुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. जिममध्ये व्यायाम करताना पुनितला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र पुनितला वाचवण्यात यश आलं नाही. पुनितचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुनितच्या निधनाच्या बातमीनंतर चाहत्यांनी रुग्णालयात मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. विक्रम रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याच्या निधनानं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. कन्नड मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. 


पुनित नेहमीच आपल्या कुटुंबाला मीडियापासून दूर ठेवत होता. मात्र त्याने एक मुलाखतीमध्ये त्याच्या लव्हस्टोरीविषयी सांगितलं होतं. प्रेम आणि लग्नापर्यंतचा त्याच्या या प्रवासाबद्दल त्याने वक्तव्य केलं होतं. 


पुनित आणि अश्विनीची ओळख त्यांच्या एका कॉमन फ्रेण्डमधून झाली होती. दोघंही पहिल्यांदा एक इव्हेंटमध्ये एकमेकांना भेटले होते. त्यांची मैत्री वाढत गेली. 8 महिन्यांच्या मैत्रीनंतर पुनितने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पुनितने अश्विनीला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. 1999 मध्ये दोघांनी लग्न केलं.



अश्विनीच्या मनातही पुनितविषयी विशेष प्रेम होतं. तिही त्याच्या नकळत प्रेमात पडली होती. पुनितने प्रपोज करताच अश्विनीने देखील आपला होकार कळवला. पुनितच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला पसंती दिली. मात्र अश्विनीच्या घरी थोडी समस्या होती. अश्विनीच्या घरचे दोघांच्या लग्नासाठी तयार व्हायला 6 महिने गेले. 


अश्विन आणि पुनितने 6 महिने घरच्यांनाही मनवण्याचा प्रयत्न केला. अखेर 6 महिन्यांनंतर दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं. परफेक्ट जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जायचं. आता मात्र ही जोडी तुटली आहे. पुनितच्या अचानक जाण्याने अश्विनीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.