जिममधून आल्यानंतर पुनीत राजकुमाची अवस्था कशी होती? मृत्यूपूर्वीच्या संपूर्ण स्थितीबद्दल डॉक्टरांच वक्तव्य म्हणाले...
त्याच्या मृत्यूपूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम खुद्द त्यांच्या डॉक्टरांनी दिली आहे.
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी निधन झाले.त्याच्या अचानक जाण्याने साऊथ इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. एवढेच काय तर त्याच्या चाहत्यांना देखील या घटनेवरती विश्वास ठेवणे कठीण होत आहे की, त्याचा लाडका सुपर स्टार आज या जगात नाही. तो फिटनेस फ्रीक होता, तरी देखील त्याचे अचानक निधन का आणि कसे झाले? असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे. तर त्याच्या मृत्यूपूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम खुद्द त्यांच्या डॉक्टरांनी दिली आहे.
कन्नड सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध स्टार पुनीत राजकुमार याचे २९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. रविवारी सकाळी त्यांची मुलगी अमेरिकेतून परतल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने पुनीतचे निधन झाले.
अशा प्रकारे जगाचा निरोप घेतल्याने त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तो बऱ्यापैकी निरोगी होता, त्यामुळे त्याचा अचानक मृत्यू कसा झाला याबद्दल त्याच्या डॉक्टरांनी सांगितले आहे, त्याच्या मृत्यूपूर्वीच्या घटनांचा संपूर्ण क्रम जाणून घ्या.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुनीत राजकुमारचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुनीत व्यायाम केल्यानंतर आजारी पडला होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्याने नाश्ता केला. यानंतर ते तत्काळ पत्नी अश्विनीसह रमनश्री दवाखान्यात फॅमिली डॉ. रमनराव यांच्याकडे गेले.
डॉक्टरांकडे गेल्यानंतर पुनीत राजकुमारने सांगितले की, जिममधून बाहेर आल्यानंतर त्याला घाम येऊ लागला. त्याने सर्व प्रकारचे व्यायाम केले. त्याने जिममध्ये बॉक्सिंगही केले आणि त्याच्या शरीरात काहीतरी गडबड असल्याचे डॉक्टरांना सांगितले.
सकाळी 11.10 वाजता अभिनेता पुनीतच्या हृदयाची कार्यक्षमता ईसीजीद्वारे तपासण्यात आली. डॉ.रामणरावांनी ताबडतोब मोठ्या दवाखान्यात त्याला नेण्याचा सल्ला दिला. कारण त्याला त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य वाटत नव्हते.
यादरम्यान अभिनेत्याला कारपर्यंत देखील चालता येत नव्हते. त्याला व्हीलचेअरच्या सहाय्याने गाडीत बसवण्यात आले. यानंतर त्याला तातडीने विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पत्नीने गाडीतूनच डॉक्टरांना बोलावले.
त्यानंतर पुनीतला सकाळी 11.45 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे विक्रम रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. ज्यानंतर काही काळाने त्याचा मृत्यू झाला.