मुंबई : सध्या सगळीकडे 'चंद्रमुखी' सिनेमाचा बोलबाला आहे. या सिनेमाचं प्रमोशन सध्या जोरदार सुरुये. असाच एक प्रमोशन फंडा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये  अमृता खानविलकर पुण्यातील मेट्रेमध्ये 'चंद्रा' गाण्यावर थिरकताना दिसतेय. मुख्य म्हणजे अभिनेत्रीसोबत बरीच लहान मुलं देखील या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. सोशल मीडिावर अमृता खानविलकरचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. अवघ्या काही वेळातच या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात अमृता खानविलकर चंद्रा या मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर खा.दौलतराव यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. या कलाकारंसोबतच या सिनेमात मृणमयी देशपांडे देखील एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मीती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. 



या सिनेमातील गाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेकजण या सिनेमातील चंद्रा या गाण्यावर रिल्स बनवताना दिसत आहेत. चंद्रा हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या सिनेमाला अजय-अतूल यांचं संगीत आहे. हा सिनेमा २९ एप्रिलाला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.