अमर काणे, झी मीडिया, नागपूर : पुणेरी बाण्यावर नागपुरी तडका असलेला एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय.अभिनेत्री  समिधा गुरूने नागपुरी बोली भाषेतील काही खास शब्दांचा हा व्हिडिओ ओळख असलेला हा व्हिडिओ तयार केलाय. मूळची  नागपूरकर अभिनेत्री समिधा गुरू आणि तिच्या मैत्रिणींचा हा 29 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. समिधा गुरू, तिची बहीण मृणाल देशपांडे, भार्गवी चिरमुले व सई रानडे या चौघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर समिधाने अपलोड करताच वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. त्याला कारण समिधाने दिलेला नागपुरी तडका आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारणत: विदर्भातील माणूस पुण्या मुंबईत गेला की त्याला त्याच्या भाषेवरून चांगलेच ट्रोल केले जाते. पूर्व नागपुरात झाडीबोली, अमरावती विभागात वऱ्हाडी आणि नागपुरात नागपुरी बोली बोलली जाते. प्रत्येक बोलीचे एक वैशिष्ट्य आहे. वऱ्हाडी,नागपुरी  बोलीचा ठसकाच निराळा आहे.



समिधाने व्हायरल केलेल्या व्हिडीओत चार मराठी शब्दांचे समानार्थी वऱ्हाडी-नागपुरी शब्द या 29 सेकंदाच्या व्हिडिओत सांगितले आहेत. मात्र पुणेरी बाण्यावर वऱ्हाडी तडका अशा अंगाने हा व्हिडिओ विदर्भात  नेटकरी घेत आहे. दरम्यान प्रमाण शब्दांना  नागपुरी अर्थ सांगणारे  आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर आणणार असल्याचे समिधाने सांगितले. 


विदर्भाच्या वऱ्हाडी, नागपुरी  बोलीने आपले वेगळे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.त्याचाच प्रत्येय या व्हिडिओच्या निमित्ताने चर्चेत आलाय.मले, कौन,झामल-झांमल,भैताड या शब्द खास नागपुरी -वऱ्हाडी शब्दांचा जांगडगुत्ता भन्नाट झाला आहे.