मुंबई : सध्याच्या घडीला भारतात फक्त बॉलिवूडच नव्हे तर विविधभाषी कलाविश्वातील चित्रपटही दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. पंजाबी चित्रपटसृष्टीसुद्धा त्याचाच एक भाग. आजवर पंजाबी कलाजगतातून अनेक चेहऱ्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याचं पाहायला मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे पंजाबच्या कलाजगतातील अनेक चेहऱ्यांना प्रेक्षकांची कमाल पसंती मिळताना दिसते. यामध्ये अभिनेते, अभिनेत्री आणि इतरही कलाकारांचा समावेश आहे. 


सध्या एक पंजाबी कुडी सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आली आहे. तिनं आपल्या सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ केलं आहे. ही रुपवान अभिनेत्री आहे सोनम बाजवा. (Actress Sonam Bajwa)



एरव्ही सोनम तिच्या एथनिक लूकसाठी चर्चेत असते. पंजाबी सूट, लेहंगा अशा एकंदर लूकमध्ये ती बऱ्याचदा प्रेक्षकांसमोर येते. पण, यावेळी तिनं ही चौकट मोडली आहे. 




अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून नावारुपास आलेल्या सोनमचा सध्या असा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिनं खांद्यावरून शर्ट करकवत कॅमेऱ्यासमोर पोझ दिली आहे. 




एकटक रोखलेली नजर, चमकदार कांती आणि ओले भासणारे केस असा तिचा लूक पाहून बरेचजण घायाळ झाले आहेत. 



एखाद्या फोटोशूटमुळं चर्चेत येण्याची सोनमची ही पहिलीच वेळ नसली तरीही तिचा हा बोल्ड अंदाज मात्र फार वेळांनंतर सर्वांच्याच काळजाचा ठाव घेऊन गेला आहे. बऱ्याच आघाडीच्या चित्रपटांतून झळकलेली सोनम तुम्हाला कोणत्या लूकमध्ये भावली, पारंपरिक की बोल्ड?