मुंबई : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री महत्वाची असते, हे अधोरेखित करणारा 'मुसाफिरा' चित्रपट येत्या २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरमध्ये हे चारही 'मुसाफिरा' एकत्र दिसत असून या चौघांची ओळख या पोस्टरमधून होत आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रॉडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत 'मुसाफिरा' या चित्रपटाचे पुष्कर जोग दिग्दर्शक आहेत. 'मुसाफिरा'च्या घोषणेपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. आता या नवीन पोस्टरमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुसाफिरा'मध्ये पुष्कर जोग हॅप्पी आणि हॅपेनिंग 'निशांत'ची भूमिका साकारणार असून पूजा सावंत सुपरस्टार 'मेघा'च्या भूमिकेत दिसणार आहे. स्वभावाने भोळा असणाऱ्या 'अमेय'च्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकर आहे. तर दिशा परदेशी ग्रुपला जोडून ठेवणारी प्रचंड एनर्जेटिक आणि तितकीच क्युट असलेली 'मिथिला' साकारणार असून ग्रुपमधील नाजूक प्रकरण आणि प्रचंड हळव्या 'क्रेया'च्या भूमिकेत स्मृती सिन्हा आहे. या चौघांच्या या भन्नाट पोस्टरममधून त्यांचे बॉंडिंग दिसत आहे. आता ही मैत्री कोणत्या वळणावर जाणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. 


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणतात, '' हा चित्रपट प्रेक्षकांना नॉस्टेल्जिक बनवेल. चार वेगवेगळ्या पार्श्वभूमी असणाऱ्या मित्रांची ही गोष्ट आहे. यात प्रेम आहे, मैत्री आहे, दुरावाही आहे. त्यामुळे हे रियुनियन त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणणार का, त्यांचा सगळ्यांचा प्रवास वेगळ्या मार्गाने होणार, याचे उत्तर 'मुसाफिरा'मधून मिळणार आहे. हा चित्रपट तुम्हालाही तुमच्या मैत्रीची आठवण करून देईल.''


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असतानाच काही दिवसांपुर्वीच या चित्रपटातील 'मुसाफिरा' हे टायटल सॉन्ग संगीतप्रेमींच्या भेटीला आलं होतं.या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोगनं केलं आहे. तर, निर्माते आनंद पंडित, नितीन वैद्य, वितरक नानूभाई जयसिंघानी, पुष्कराज चिरपुटकर, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातील टायटल सॉन्ग एकत्र फिरणे, हसणे, खेळणे, रडणे अशा अनेक गोष्टी मैत्रीत केलेल्या असतात, अगदी भांडणेही. मैत्रीच्या या अशाच सुखद आठवणींना उजाळा देणारे आणि दूर गेलेल्या मित्रांना एकत्र आणणारे हे गाणे आहे. यात धमाल, प्रेम, मैत्री अशा अनेक भावना आहेत.