अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; `पुष्पा 2` सिनेमाचं शूटिंग पडलं बंद
साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा क्वचितच कोणी असेल ज्याने पाहिला नसेल. जेव्हा हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर चांगला बोलबाला होता. या सिनेमाचा पुढचा भाग पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
मुंबई : साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा क्वचितच कोणी असेल ज्याने पाहिला नसेल. जेव्हा हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर चांगला बोलबाला होता. या सिनेमाचा पुढचा भाग पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2' या सिनेमाबाबत आता खूप मोठी अपडेट समोर येत आहे. जी ऐकून तुम्हाला काळजी वाटू शकते. काहीच महिन्यांआधी एक बातमी समोर आली होती अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2' हा सिनेमा मोठ्या पडद्यावर 2024 मध्ये रिलीज होणार आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार अल्लु अर्जूनच्या 'पुष्पा 2'चं शुटिंग पोस्टपोन करण्यात आलंय. जे ऐकून अल्लू अर्जुनचे चाहते नाराज झाले आहेत.
मोस्ट अपकमिंग सिनेमा म्हणून 'पुष्पा 2' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र आता 'पुष्पा 2'चं शुटिंग थांबवण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनचा शुटिंग दरम्यान अपघात झाला. या अपघातात तो जखमी झाला आहे. त्यामुळे या सिनेमाचं शुटिंग काही काळासाठी थांबवण्यात आला आहे. अॅक्शन सीन शूट करत असताना अल्लू अर्जुनचा हा अपघात झाला आहे. अल्लूच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचमुळे अल्लूचं हे शुटिंग काही काळासाठी थांबवलं गेलं आहे. ही बातमी समोर येताच अभिनेत्याचे चाहते मात्र प्रचंड नाराज झाले आहे. अभिनेता लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.
मात्र जरी ही बातमी समोर आली असली तरी या सिनेमाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे हे पाहणं महत्वाचं राहिल के या सिनेमाची टीम कधी याबाबत अधिकृत घोषणा करतेय. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदानाचा सिनेमा 'पुष्पा 2'चं शूटिंग पोस्टपोन होण्याच्या बातमीने सगळेच हैराण झाले आहेत. अल्लू अर्जुनला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. समोर आलेल्या बातमीनुसार 'पुष्पा 2' या सिनेमाचं शूटिंग डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होवू शकतं. प्रेक्षक अल्लूच्या या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2'ने बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अनेक रेकॉर्ड मोडित काढत इतिहास रचला होता.