तिसऱ्या शनिवारी बॉक्स ऑफिसवर `पुष्पा 2`चा डंका, केली प्रचंड कमाई, पाहा कलेक्शन
अल्लू अर्जुनच्या `पुष्पा 2` चित्रपटाने तिसऱ्या शनिवारी बंपर कमाई केली. मात्र, 17 व्या दिवशीही `पुष्पा 2` चित्रपट `बाहुबली: द कन्क्लूजन` या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरला.
Pushpa 2 Box Office Collection Day 17: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित होऊन आता 17 दिवस झाले आहेत. परंतु, अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करताना दिसत आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट वेगवेगळे रेकॉर्ड बनवत आला आहे. तर या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. अशातच आता या चित्रपटाने तिसऱ्या शनिवारी देखील बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये 725.8 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 264.8 कोटींची कमाई केली. अशातच आता या चित्रपटाने तिसऱ्या गुरुवारी म्हणजेच 15 व्या दिवशी 17.65 कोटींची कमाई केली. 16 व्या दिवशी 14.3 तर 17 व्या दिवशी 'पुष्पा 2' चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाली. या चित्रपटाने 25 कोटींची कमाई केली.
'बाहुबली: द कंक्लूजन' चे रेकॉर्ड तोडण्यात 'पुष्पा 2' अपयशी
बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' चित्रपटाने 17 दिवसांमध्ये एकूण 1029.9 कोटी रुपयांची कमाई केली. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 17 व्या दिवशी भारतात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट 'बाहुबली: द कंक्लूजन'चा रेकॉर्ड मोडू शकला नाहीये. प्रभासचा हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात 1030.42 कोटींची कमाई केली होती. 'बाहुबली: द कंक्लूजन' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडताच 'पुष्पा 2' चित्रपट भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट ठरू शकतो.
'पुष्पा 2' चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन
'पुष्पा 2' चित्रपटाने वर्ल्डवाइड 1500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाइड 1500 कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत.