Pushpa 2 Making Video: साउथ अभिनेता अल्लू अर्जुन, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि फहद फासिल यांचा 'पुष्पा 2' चित्रपट जगभरात रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक राहिला आहे. 'पुष्पा 2' हा 2024 मधील बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटात अॅक्शन ड्रामा आणि मनोरंजन देखील असणार आहे. याचीच प्रचिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 'पुष्पा 2' चित्रपटाच्या BTS व्हिडीओवरुन दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अॅडव्हान्स बुकिंगमधून प्रचंड कमाई केली आहे. तर, दुसरीकडे 'पुष्पा 2' चित्रपटाचा BTS व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून खूपच जबरदस्त आहे. जो पाहून प्रत्येकांच्या अंगावर शहारे येतील. 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी हा BTS व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये जंगलातील एक सेट दाखवण्यात आला आहे. हा व्हिडीओ 134 सेकंदांचा आहे. यामध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाची संपूर्ण टीम दिसत आहे. 


'पुष्पा 2'च्या BTS व्हिडीओमध्ये नेमकं काय? 


'पुष्पा 2' चित्रपटाचे निर्मात्यांनी हा BTS व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जंगलामधील सीन दाखवण्यात आला आहे. जंगलामधील या सीनमध्ये अनेक कलाकार देखील दिसत आहेत. त्यासोबतच या प्रवासात अनेक कलाकारांची मेहनत दिसून येत आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या मागे आणि त्यामधील स्फोटक व्हिज्युअल्समागे सुकुमार असल्याचं दिसत आहे. 



'पुष्पा 2' हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फासिल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोशल मीडियावर 'पुष्पा 2'चा BTS व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये 'पुष्पा' चे वर्णन फॉरेस्ट फायर असे करण्यात आले आहे. तसेच या व्हिडीओमध्ये जगपती बाबू आणि प्रकाश राज देखील दिसत आहेत. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून आतापर्यंत 62.35 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक बॉलिवूड चित्रपटांना अॅडव्हान्स बुकिंगच्या कमाईमध्ये मागे टाकले आहे.