Pushpa 2 Hindi Rights : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) चा 'पुष्पा 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाआधीच त्याच्या चाहत्यांना 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी टीझर शेअर करत आनंदाची बातमी दिली. 'पुष्पा' चे किती चाहते आहेत. हे सांगायची काही गरज नाही. अजून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही. इतकंच काय तर प्रदर्शनाची तारिखही समोर आलेली नाही. तरी सुद्धा 'पुष्पा 2' चित्रपटानं कोटींची कमाई केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) वाढदिवसानिमित्त चित्रपट निर्मात्यांनी 'पुष्पा 2' चित्रपटाची पहिली झलक दाखवली होती. त्याची एक छोटी क्लिप प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आला होता. त्यानंतर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्तानं चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला होता. चित्रपटाच्या हिंदी टीझरला तब्बल 6 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. 



तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रदर्शनाच्या आधीच चित्रपटानं इतक्या कोटींची कमाई कशी केली? सगळ्यात लक्षवेधी बाब म्हणजे 'पुष्पा 2' च्या हिंदी व्हर्जनचे राईट्स 200 कोटींमध्ये विकले गेले आहेत. इतकंच काय तर त्याचे ऑडिओ राईट्सदेखील 75 कोटींना विकण्यात आले आहेत. त्यामुळे आता निर्मात्यांची अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यांना आशा आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 2 हजार कोटींचा गल्ला करेल. आता या टीझरनंतर या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे ओटीटी राईट्स मोठ्या किंमतीला विकले गेले आहेत.


हेही वाचा : 'देव डी' फेम अभिनेत्री Mahie Gill 'या' व्यक्तिसोबत अडकली लग्न बंधनात?


पुष्पाराजच्या शोधात असलेल्या पोलिसांना त्याचा तपास लागत नाही, त्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर त्याचा एक व्हिडीओ समोर येतो. या व्हिडीओत पुष्पराज हा जंगल्यात असल्याचं दिसतं. सगळ्यात लक्षवेधी बाब म्हणजे पुष्पाला पाहून वाघही घाबरतो. तर अल्लू अर्जुननं शेअर केलेल्या त्याच्या लूकनं तर सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. त्याचं कारण म्हणजे अल्लु अर्जुननं साडी नेसली होती. हा चित्रपट २०२३ च्या शेवटी किंवा २०१४ च्या सुरुवातीला प्रदर्शित होईल असं बोललं जात आहे.


चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे. त्यानंतर अशी देखील चर्चा सुरु आहे की त्या दोघांसोबत लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी देखील या चित्रपटात दिसणार आहे. पहिल्या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहिल्यानंतर दुसऱ्या भागारकडून प्रेक्षकांना खूप जास्त अपेक्षा आहेत. तर चित्रपटाच्या टीझरनं तर सगळ्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.