111 वर्षांचा भारतीय चित्रपटांचा इतिहास अन् `पुष्पा 2` च्या नावावर 11 मोठे रेकॉर्ड
1913 मध्ये `हरिश्चंद्र` चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारतीय सिनेमाचा पहिला चित्रपट ठरला. आता याला 111 वर्ष झाली असून या चित्रपटाचा रेकॉर्ड `पुष्पा 2` चित्रपटाने मोडला आहे.
Pushpa 2 Box Office: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने भारतीय चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 'पुष्पा 2' चित्रपटाने 2024 नाही तर 1913 मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटाचा इतिहास मोडला असून 'पुष्पा 2' हा बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये एक नंबरवर आहे.
दरम्यान, अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने काही दिवसांमध्येच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. आतापर्यंत 'पुष्पा 2' चित्रपटाने 11 रेकॉर्ड बनवले आहेत.
1. पहिला रेकॉर्ड- 'पुष्पा 2' हा चित्रपट सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 164.25 कोटींची कमाई केली.
2. दुसरा रेकॉर्ड- सर्वात जलद 100 कोटींची कमाई करणारा 'पुष्पा 2' हा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने काही तासांमध्येच हा विक्रम केला होता.
3. तिसरा रेकॉर्ड- 'पुष्पा 2' चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच वीकेंडमध्ये 529 कोटींची कमाई करुन नवीन रेकॉर्ड बनवला.
4. चौथा रेकॉर्ड- अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 725.8 कोटींची कमाई केली. आतापर्यंत पहिल्याच आठवड्यात इतकी कमाई कोणत्याच चित्रपटाने केलेली नाहीये.
5. पाचवा रेकॉर्ड- 16 दिवसांमध्ये सर्वात जलद 1000 कोटींची कमाई करणारा 'पुष्पा 2' चित्रपट ठरला. या चित्रपटाने 1004.9 कोटींची कमाई केली.
6. सहावा रेकॉर्ड - या चित्रपटाने 18 व्या दिवशी 1062.6 कोटींची कमाई करून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. या आधी हा रेकॉर्ड 'बाहुबली 2' चित्रपटाच्या नावावर होता.
7. सातवा रेकॉर्ड- 1100 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट हा 'पुष्पा 2' आहे. प्रदर्शित झाल्यानंतर 21 व्या दिवशी चित्रपटाने हा रेकॉर्ड बनवला आहे.
8. आठवा रेकॉर्ड- 'पुष्पा 2' हा चित्रपट हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा साउथचा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने हिंदीमध्ये 755 कोटींची कमाई केली आहे.
9. नववा रेकॉर्ड- 2023 मध्ये प्रदर्शित झालेला 'जवान' या चित्रपटाने हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई करून पहिला क्रमांक मिळवला होता. परंतु, आता या बाबतीत अल्लू अर्जुन पहिल्या क्रमांकावर आहे.
10. दहावा रेकॉर्ड- 'पुष्पा 2' हा चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 'बाहुबली 2' हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर आमिर खानचा 'दंगल' चित्रपट आहे.
11. आकरावा रेकॉर्ड- 'पुष्पा 2' मध्ये असलेल्या प्रत्येक स्टारचा सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल या कलाकारांचा समावेश आहे.
(टीप- वरील सर्व माहिती सैक्निल्कच्या रिपोर्टनुसार नमूद केलेल्या बॉक्स ऑफिस कलेक्शनशी संबंधित डेटावरती आधारित आहे. )