Pushpa 2: साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने 'पुष्पा' चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'  हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट बदलून 5 डिसेंबर केली आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, 'पुष्पा 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. नुकतीच त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 'पुष्पा 2'  चित्रपटाचे प्रदर्शन केरळच्या चित्रपटगृहांमध्ये 24 तास सुरु असणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. तसेच थिएटरबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होणार नाही.  त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याच देखील म्हटलं जात आहे.


आता पर्यंत 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. रिलीजपूर्वीच चित्रपटाने 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.


'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार 


 E4 Entertainment च्या रिपोर्टनुसार, केरळमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे वितरण केले आहे. ज्यामध्ये 'लाइफ ऑफ पाई', 'चेन्नई एक्सप्रेस', 'फास्ट एंड फ्यूरियस', 'एमएस धोनी', 'एक्वामैन', 'बैटमैन वरसेज सुपरमैन', 'संजू', 'अवतार', 'एनिमल' आणि 'पुष्पा: द राइज' यांचा समावेश आहे. पुष्पा चित्रपटाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर सर्वांना अपेक्षा आहे की, या चित्रपटाच्या सिक्वेल देखील बॉक्स ऑफिसवर चमत्कार करेल. 


मुकेश आर यांच्या म्हणण्यानुसार,  'पुष्पा 2' चे दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना एक खास दृश्य अनुभव देण्याचा विचार करत आहेत. 'पुष्पा 2' या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे आयटम साँग देखील लोकांना पाहायला मिळणार आहे. यासोबत या आयटम साँगमध्ये अल्लू अर्जुन देखील दिसणार आहे. अल्लू अर्जुन आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.