मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'पुष्पा' Pushpa the rise या चित्रपटानं संपूर्ण भारतीय बॉक्स ऑफिसवरच डंका वाजवला. रश्मिका मंदानानं साकारलेली श्रीवल्ली आणि समंथाच्या आयटम डान्सनं या चित्रपटाला आणखी रंगत दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर, चित्रपटामध्ये खलनायकी भूमिका साकारणाऱ्यांनीही 'पुष्पा'ला खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. 


चित्रपट प्रदर्शित झाल्या दिवसापासून ते अगदी आजपर्यंत संवाद, चित्रपटातील गाणी हे सर्वकाही प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलं आणि चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता शिगेला पोहोचली. 


आता याच उत्सुकता आणि कुतूहलाच्या वातावरणात 'पुष्पा'शी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. 


येत्या काळात 'पुष्पा'चा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच प्रकाशझोतात येण्यास सुरुवात झाली आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार मोठमोठ्या निर्मिती संस्थांनी पुष्पाच्या दिग्दर्शकांशी संपर्क साधत एक धमाकेदार प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे. 


एका निर्मिती संस्थेनं चित्रपटाच्या प्रत्येक भाषेतील थिएट्रीकल रिलीजसाठी जवळपास 400 कोटी रुपयांचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे. 


चित्रपटांच्या या हक्कांमध्ये ओटीटी आणि सॅटलाईट हक्कांचा समावेश आहे. आता पुढे चित्रपटाशी संबंधितांकडून कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


'पुष्पा'चा दुसरा भागही तितकाच दमदार प्रदर्शन करु शकतो याबाबत संपूर्ण टीमला कमालीचा आत्मविश्वास आहे. या चित्रपटाला एकंदरच येणारे प्रस्ताव पाहाता चित्रपटाच्या लोकप्रियतेचा सहज अंदाजही लावता येत आहे. 


'पुष्पा'चं हे यश पाहता आता बसतोय ना विश्वास तो का म्हणतो, 'मै झुकेगा नही'.