Rashmika Mandanna Clarification On Removed The Kannada Film Industry : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिकानं पुष्पा या चित्रपटातील तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली. रश्मिका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या रश्मिकाबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. ज्यानुसार रश्मिकाला कन्नड चित्रपटसृष्टीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याच आल्याचे म्हटले जात आहे. 


रश्मिकानं दिलं हे उत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत रश्मिकाला विचारण्यात आलं होतं की, 'तिने सध्या लोकप्रिय असलेला ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' चित्रपट पाहिला आहे का?' या प्रश्नावर रश्मिका म्हणाली, 'अजून नाही.' रश्मिकानं हे उत्तर ऐकताच एका वादाला तोंड फुटले आणि रश्मिकाला कन्नड चित्रपटांबद्दल शून्य आदर असल्याबद्दल कन्नड चित्रपटांच्या अनेक चाहत्यांनी तिच्या विरोधात नारेबाजी केली आणि यासोबतच तिच्या मनात मातृभूमीसाठी आदर नसल्याचे सांगितले म्हटले.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


याशिवाय रश्मिका नुकतीच 'कर्ली टेल्स'शी बोलत होती, तेव्हा तिला तिचा करिअरच्या सुरुवातीला आलेल्या अनुभवाबद्दल विचारण्यात आलं. तिला संधी कशी मिळाली याविषयी विचारलं. या प्रश्नाचे उत्तर देताना रश्मिकानं कन्नड प्रोडक्शन हाऊस 'परमाह' चं नाव घेतलं नाही. या स्टुडिओमधून अभिनेत्रीनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. रश्मिकाच्या या उत्तरानंतर अशी चर्चा पसरू लागली की तिच्यावर कन्नड चित्रपटसृष्टीत बंदी घालण्यात आली आहे कारण तिला चित्रपटसृष्टीबद्दल आदर नाही. मात्र अभिनेत्रीनं ही अफवा असल्याचे सांगितले.


हेही वाचा : आम्ही एकत्र राहत होतो आणि...; Disha Patani सोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर अॅलेक्झॅन्डरचं वक्तव्य


 या बातम्या पसरल्यानंतर रश्मिकानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या सर्व अफवा असल्याचे म्हटले आणि 'ट्रोल करणार्‍यांसाठी तिच्या हृदयात फक्त प्रेम आहे' असे सांगितले.