मुंबई : साऊथमध्ये प्रसिद्धी मिळवलेल्या रश्मिका मंदान्नाने आता बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर ती सध्या 'पुष्पा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पुष्पा द राइज या चित्रपटात अल्लू अर्जुनची खूप प्रशंसा केली जात आहे. तर रश्मिका मंदान्नाला देखील खूप पसंती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक होत आहे. रश्मिका मंदान्ना हे दक्षिणेतील एक मोठं नाव आहे. जिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. विशेषत: तिच्या लव्ह लाईफबद्दल, ज्याची खूप चर्चा आहे. रश्मिका मंदान्ना सध्या साऊथच्या राऊडीला डेट करत आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून विजय देवरकोंडा आहे.


विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या रिलेशनशिपची चर्चा
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना एकमेकांना डेट करत आहेत आणि एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी झाली आहे. मात्र या वृत्तांवर दोघांनी अद्याप तरी मौन बाळगलं आहे. विजय देवरकोंडा हा दक्षिणेतील सिनेसृष्टीचं एक मोठं नाव आहे. विशेषतः अर्जुन रेड्डीनंतर तो सुपरहिट स्टार बनला आहे.


बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार रश्मिका मंदाना
रश्मिका मंदानाने आता  साऊथ ते मुंबई प्रवास केला आहे. ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचीही सध्या खूप चर्चा होत आहे. कारण शेरशाहनंतर सिद्धार्थ मल्होत्राकडून अपेक्षा खूप वाढल्या आहेत. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येणार आहे.  नुकतीच बातमी आली आहे की, पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका मंदानाने तिची फी दुप्पट केली आहे.