मुंबई : ''पुष्पा'' हा दक्षिण भारतातला सिनेमा देशभर पाहिला जात आहे, हा चित्रपट जास्तच जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्मात्याचा प्रयत्न आहे, म्हणून हा सिनेमा काही निवडक भाषांमध्ये देखील आला आहे. यात हिंदीचा देखील समावेश आहे. हिंदीत आलेल्या ''पुष्पा'' सिनेमात मात्र मराठी भाषेला मानाचं स्थान आहे असंच म्हणता येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण चित्रपटातील महत्त्वाचे संवाद हे मराठीत आहेत. यात 'चला साहेब', 'ये चल रे', तर पुष्पाची आई लग्नाची मागणी घालायला येते, तेव्हा पुष्पा 'चल आई चल' असं म्हणतो. तर 'आला मोठ्ठा शहाणा', असे  मराठी शब्द असलेले शब्द संवाद आहेत.


पुष्पा सिनेमातील हे संवाद मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी प्रेक्षकांचा विचार करुन वापरले असावेत असा अंदाज आहे. एकंदरीत मराठी पाट्या आणि मराठी शाळा वाचवण्यावर महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत असली.


तरी महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांमध्ये संवादात मराठी भाषेतील शब्दांचाच प्रभाव आहे. यावरुन मराठी भाषेतील कणखर बाणा वेळोवळी दिसून येतो, आणि यामुळे मराठी भाषेचा प्रभाव, वचक आणि वय वाढतच राहणार आहे.


अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईझ या सिनेमातील त्याच्या पुष्पा या सिनेमाला श्रेयस तळपदे याने आवाज दिला आहे. अल्लू अर्जुन याने पहिली पत्रकार परिषद घेतली होती, तेव्हा सर्वांना माझा नमस्कार असं मराठीत म्हटलं होतं. मी मद्रासी असल्याने मला इतर भाषा बोलताना उच्चार ठळक येत नाहीत, म्हणून सांभाळून घ्या असंही त्याने म्हटलं होतं.