Pushpa Allu Arjun : पुष्मा या चित्रपटाने अख्खा देशाला वेड लावलं आहे. यातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली. भरपूर गल्ला जमावल्यानंतर आता पुष्पाचा सीक्वल लवकरच येणार आहे. 'पुष्पा 2' टीझर (Pushpa 2 Release Date) अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun Pushpa)वाढदिवसाच्या आधल्या दिवशी प्रदर्शित केला होता. या टीझरमुळे चाहत्ये या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

350 कोटींहून अधिक कमावलेल्या या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण तुम्हाला माहिती आहे का, या चित्रपटासाठी अल्लू अर्जुन ही दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हता. अगदी बरोबर पुष्पामधील या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने दुसऱ्या अभिनेत्याला अप्रोच केलं होतं. या अभिनेत्याचं नाव ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. 


या अभिनेत्याला विचारलं होतं


मनोरंजन क्षेत्रातील सूत्रांनुसार दिग्दर्शक सुकुमार यांनी चंदनाच्या तस्करीबाबत एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांनी पुष्पाची स्क्रिप्ट लिहिली. या पुष्पासाठी सुकुमार यांनी साऊथ सुपरस्टार महेश बाबूला (Mahesh Babu)'पुष्पा: द राइज'साठी विचारण्यात आलं होतं. महेश बाबूला पुष्माची स्टोरी वाचून दाखविण्यात आली होती. 



मात्र महेश बाबू यांना नायकाची नकारात्मक प्रतिमा आवडली नव्हती, म्हणून त्यांनी हा चित्रपट नाकारला होता. जर महेश बाबूने हो म्हटलं असतं तर 'महाराष्ट्राचा जावई'  (Mahesh Babu Instagram) पुष्पामध्ये झळकला असता.



त्यानंतर दिग्दर्शक यांची अभिनेत्याची शोध सुरु झाली. मग त्यांनी अल्लू अर्जुनशी (Allu Arjun Films) संपर्क साधला. अल्लूने लगेचच या चित्रपटासाठी होकार दिला.