मुंबई : बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला बरेली इंटरनॅशनल युनिर्व्हसिटकडून डॉक्टरेट हे पदवी देण्यात येणार होती. मात्र धुक्यामुळे प्रियंकाला रविवारी तेथे पोहोचणे शक्य झालं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर प्रियंका चोप्राने सोशळ मीडियामार्फत मॅसेज दिला की, मला खूप दुःख आहे की बरेली इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीत स्वतः उपस्थित राहू शकली नाही. आणि डॉक्टरेट ही पदवी स्विकारू शकली नाही. आम्ही विमानतळावर ग्रीन सिग्नलची वाट पाहतच राहिलो.  पण दाट धुक्यांमुळे सगळा बेत फसला. तेथील जुन्या मित्रांना व नातेवाईकांना भेटण्याची इच्छाही अधुरीच राहिली, असे प्रियांकाने सोशल मीडियावर लिहिले आहे.


80 मुलांना घेतलं दत्तक 


 सामाजिक कार्यातील योगदानासाठी प्रियांकाला मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले. आता प्रियांकाने असे काय सामाजिक कार्य केले, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर स्वत: प्रियांकाने आपल्या सामाजिक कार्याबद्दल संक्षिप्त माहिती दिली आहे. प्रियांका युनिसेफची जागतिक सद्भावना दूत आहे, हे तुम्हाला माहित आहेच. या नात्याने प्रियांका सध्या जगभरात फिरून मुलांच्या अधिकारांबद्दल जनजागृती करतेय. बालविवाह, हुंडा प्रथा, शिक्षण, स्वच्छता अशाा अनेक मुद्यांवर ती काम करतेय. याशिवाय प्रियांकाचे एक फाऊंडेशन आहे. या फाऊंडेशनने ८० मुले दत्तक घेतली आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च प्रियांकाने उचलला आहे. या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर प्रियांका स्वत: लक्ष ठेवून असते. या सर्व मुलांचे रिपोर्ट्स कार्ड प्रियांकाकडे येतात. प्रियांकाच्या मते, देशातील समस्या दूर करणे कुण्या एकट्याची जबाबदारी नाही तर ती सर्वांची जबाबदारी आहे.  


प्रियंकाला तिच्या आगामी कामाबद्दल विचारलं असतं तर ती म्हणाली, सध्या ती क्वांटिकोच्या तिसऱ्या सिझनवर काम करत आहे. हे सिझन मार्च ते एप्रिल महिन्यात संपणार आहे. यानंतर ती तिच्या सिनेमांच्या प्रोजेक्टवर काम करणार आहे. प्रियंकाचं म्हणणं आहे की ती तिच्या 6 ते 7 सिनेमांच्या निर्मितीची देखील काम करणार आहे. त्यामध्ये काही हिंदी आणि इतर भाषेत सिनेमे आहेत.