मुंबई : ब्रिटनची राणी एलिझाबेथ II (Queen Elizabeth II ) यांच्या निधनानंतर सर्व जगावर शोककळा पसरली आहे.  एलिझाबेथ II यांनी वयाच्या 96 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानं संपूर्ण जगात शोककळा पसरली आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही एलिझाबेथ II यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख होणार आहे. खरंतर, महाराणी एलिझाबेथ यांनी अमिताभ बच्चन यांना निमंत्रण पाठवले होते आणि ते बिग बींनी नाकारले होते. (Queen Elizabeth II invited amitabh bachchan but he rejected queens invitation know the reason)


आणखी वाचा : Aishwarya Rai Troll : वय लपवण्यासाठी ऐश्वर्यानं असं काय केलं की होतेय ट्रोल, पाहा फोटो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्वीन एलिझाबेथ यांनी फेब्रुवारी 2017 च्या अखेरीस बकिंघम पॅलेस येथे राजघराण्याच्या वतीनं 'यूके-इंडिया इयर ऑफ कल्चर' या भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये जगभरातून निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी त्यांनी बॉलिवूडचे मेगास्टार आणि देशातील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना आमंत्रित केले. मात्र, अमिताभ यांनी या भव्य कार्यक्रमाचे आणि राणीचं निमंत्रण नाकारलं होतं.


आणखी वाचा : Video : आलियाला मिळणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्सवर ऐश्वर्या जळते? हे काय बोलून गेली


अमिताभ यांच्या पब्लिसिस्टनं एक स्टेटमेंट जाहिर करत राणीचं निमंत्रण नाकारण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. 'होय, मिस्टर बच्चन यांना बकिंघम पॅलेस येथे यूके-इंडिया वर्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी राणी एलिझाबेथकडून खास आमंत्रण मिळालं आहे, परंतु दुर्दैवानं त्यांनी आधीच केलेल्या वचनबद्धतेमुळे ते शक्य होणार नाहीत.'


आणखी वाचा : Kissing Scene तोसुद्धा इतका कठीण, की टॉपच्या अभिनेत्याला द्यावे लागले 80 टेक


गुरूवारीच राणीची तब्येत नाजूक असल्याची बातमी कळताच त्यांना तात्काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आणि हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली. राणी तिच्या शेवटच्या दिवसात Balmoral Castle मध्ये होती. येथेच तिचा मृत्यू झाला.