मुंबई : आर माधवन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने 2000 साली तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'अलायपयुथे' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि आपल्या करिअरमध्ये साऊथपासून बॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे आर माधवन आज 52 वर्षांचा झाला आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत. जेव्हा तो म्हणाला होता की, साऊथ स्टार धनुषचा मला राग येतो.


आर माधवनला जेव्हा धनुष्यचा राग येतो...
हा किस्सा 2015 सालचा आहे. जेव्हा आनंद एल राय दिग्दर्शित 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कंगना राणौतसोबत आर माधवन मुख्य भूमिकेत होता.


चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर  दिलेल्या एका मुलाखतीत माधवनने खुलासा केला होता की, त्याला धनुषचा राग येतो. खरंतर, या मुलाखतीत जेव्हा त्याला आनंद एल रायबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देत तो म्हणाला,  तो त्याच्या कलाकारांना चांगलाच ओळखतो. दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, ज्याबद्दल मला आश्चर्य वाटलं.


त्याचवेळी त्याने असंही नमूद केलं की, धनुष जेव्हा त्याचा पुढचा चित्रपट आनंद यांच्यासोबत करत होता. तेव्हा मला धनुषचा थोडा राग आला. कारण मी आनंदला मिस करणार होतो. आणि फक्त धनुषच नाही तर त्याच्या जागी दुसरा कोणी अभिनेता असता तर मला त्याचाही राग आला असता. पुढे माधवनने असंही म्हटलं की, आनंद आणि धनुषची जोडी खूप छान आहे.