मुंबईः सध्या बॉलीवूडमधील बडे सुपरस्टार जसे की आमिर खान, अक्षय कुमार यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जवळपास फ्लॉप ठरले आहेत आणि 'काश्मीर फाईल्स', 'रॉकेट्री' अशा सिनेमांनी बॉक्स ऑफिस मोठा गल्ला भरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड अभिनेता आर. माधवनचा 'रॉकेट्री' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही हा सिनेमा दाखवण्यात आला होता. या सिनेमाचा मेकर आर. माधवन मात्र सध्या वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे सगळीकडेच एक वेगळी खळबळ माजली आहे. 


सोशल मीडियावर अशा अफवा पसरल्या होत्या की आर माधवनने 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' चित्रपटाला निधी देण्यासाठी आपले राहते घर गमावले आहे. 


एका युझरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली ज्यात त्याने असे म्हटले आहे की आर. माधवनने आपले घर चित्रपटासाठी विकून खूप मोठा त्याग केला आहे. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना आर. माधवनने ट्विटरवर लिहिले की त्याने असे कुठलेच घर विकलेले नाही आणि मुख्य म्हणजे अजूनही तो त्याच्याच घरात राहत आहे. 


'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' हा चित्रपट अभिनेता आर. माधवनने लिहिलेला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रपटाची निर्मितीही आर. माधवन यांनीच केली आहे. 



ISRO मधील माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. ज्यांना हेरगिरी प्रकरणात आरोपी ठरवण्यात आले होते आणि नंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आर. माधवनने या चित्रपटात त्यांची मुख्य भूमिका साकारली आहे.