मुंबई : सिलेब्रिटी किड्सबद्दल अनेकांच्या मनात राग असतो. कारण बॉलिवूडमध्ये कुटुंब असल्यामुळे स्टारकिड्सला झगमगत्या विश्वात संधी मिळते. पण अनेकांना मात्र एका संधीसाठी मेहनत घ्यावी लागते. सिलेब्रिटी किड्स कलाकार नसले तरी त्यांच्या चर्चा कायम रंगलेल्या आहेतात. अनेक सिलेब्रिटी किड्स मज्जा,मस्ती, पार्टी मजेत आयुष्य जगतात. पण अभिनेता आर. माधवनचा मुलगा मात्र देशाचं नाव मोठं करत आहे. स्विमिंगशी मैत्री केलेल्या वेदांत माधवनने आणखी एक रेकॉर्ड मोडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर माधवनचा मुलगा वेदांतनं 1500  मीटर फ्रीस्टाइल प्रकारातील लहान गटाचा राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. या स्पर्धेत वेदांतने सुवर्णपदक जिंकलं आहे. वेदांतच्या या कामगिरीने फक्त आई-वडिलांचं नाही, तर संपूर्ण देशालाही गर्व वाटेल. 



आर. माधवनने लेकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये वेदांत पोहोताना दिसत आहे. लेकाला यशाच्या शिखरावर चढताना आर माधवन 'कधीच नाही म्हणू नका...' असा सल्ला देताना दिसत आहे.


पुढे अभिनेता म्हणतो, 'फ्रिस्टाइल नॅशनल ज्युनिअर रेकॉर्ड तोडलं..' माधवनने व्हिडीओ पोस्ट करत वेदांतला टॅग देखील करत आहे. आर. माधवनच्या मुलाची कामगिरी पाहता सोशल मीडियावर वेदांतचं कौतुक करत शुभेच्छा देत आहेत.