Kangana Ranauat and R. Madhavan: अभिनेता आर. माधवन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांची जोडी ही अनेकदा रूपेरी पडद्यावर दिसली आहे. 'तनू वेड्स मनू'मधील (Kangana Ranaut Latest News) त्यांची केमेस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या चित्रपटाचे दोन्ही भागही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतात. या दोघांमध्ये चांगली मैत्रीही आहे. परंतु नुकत्यात एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे अभिनेत्री कंगना राणावत आणि त्याच्या मैत्री कशी आहे आणि आर. माधवन (R. Madhavan Latest Interview) आपल्या या सहअभिनेत्रीबद्दल काय विचार करतो याचा अंदाज येईल. सध्या त्याचे हे वक्तव्य खूप चर्चेत ठरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहन दुआ यांना दिलेल्या मुलाखतीत आर. माधवननं सांगितले की, माझ्या चित्रपटांतून काम केलेल्या सर्व महिला या अत्यंत सशक्त आहेत. माझ्या घरातही अशा महिलांची साथ मला लाभली याचे सौभाग्य मला मिळाले. माझी आई बिहारच्या एका बॅंकेत 30 वर्षे मॅनेजर होती. यावरून तुम्हाला अंदाज येईलच की महिला या किती सक्षम असतात. 


कंगनाबद्दल बोलताना काय म्हणाला आर. माधवन? 


आर. माधवननं कंगनाविषयी चांगले उद्गार काढत तिचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, कंगना एक खूप चांगली अभिनेत्री आहे. जी आपल्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेते. ती वेगळ्यावेगळ्या जॉनरच्या चित्रपटांमधून काम करते. हे पाहून तर मला खरंच आश्चर्यच वाटते. 


हेही वाचा - 'श्वास'मधील बालकलाकार 'परशुराम' आठवतोय? 19 वर्षानंतर इतका वेगळा दिसतोय की ओळखताच येईना


कंगनाविषयी (Kangana Ranaut is a Strong Lady says R. Madhavan) बोलताना आर. माधवन म्हणाला की, कंगना रणावत ही देखील या सशक्त महिलांपैंकी एक आहेत. मी खूप भाग्यवान आहे की मला अशा स्त्री कलाकारांसह चित्रपटातून काम करण्याची संधी मिळाली. या सर्वांची आपली अशी खंबीर मतं आहेत. तुम्ही त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकणार नाही. यांना त्यांच्या पद्धतीनं काम करायला अधिक आवडते. कंगना ही काही टिपिकल अभिनेत्री नाही जर येते, काही चित्रपटांमध्ये डान्स करते आणि पुरूषांकडून मार खाते आणि निघून जाते. 


हे्ही वाचा - 68th Filmfare Awards 2023: 'फिल्मफेअर पुरस्कारा'साठी नामांकनं जाहीर! 'गंगूबाई काठियावाडी', 'द काश्मीर फाईल्स'मध्ये रंगणार चुरस...


आर. माधवन दिसणार 'या' चित्रपटांतून 


अभिनेता आर. माधवनचा रॉकेट्री हा चित्रपट प्रचंड गाजला आहे. आता लवकरच तो अजून एका बायोपिकमधून दिसणार आहे, ज्यात तो शंकरन नायर यांची भुमिका करणार आहे. अमेरिकी पंडित आणि टेस्ट हे त्याचे काही येऊ घातलेले चित्रपट आहे. तेव्हा तुम्हीही नक्कीच या चित्रपटांची आतूरतेनं वाट पाहत असाल.