'श्वास'मधील बालकलाकार 'परशुराम' आठवतोय? 19 वर्षानंतर इतका वेगळा दिसतोय की ओळखताच येईना

Shwaas Marathi Movie Child Artist: 'श्वास' हा चित्रपट प्रदर्शित गाजला होता. या चित्रपटातील बालकलाकार (Ashwin Chitale) परश्या आता मोठा झाला असून तो आपल्या करिअरच्या वेगळ्या वाटा धुंडाळतो आहे. तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Updated: Apr 25, 2023, 10:21 AM IST
'श्वास'मधील बालकलाकार 'परशुराम' आठवतोय? 19 वर्षानंतर इतका वेगळा दिसतोय की ओळखताच येईना title=
shwaas movie child artist what is doing now check his latest status marathi entertainment news

Shwaas Marathi Movie Child Artist: मराठी चित्रपटसृष्टी ही आता जगभरात लोकप्रिय ठरली आहे. ज्याप्रमाणे जागतिक प्रेक्षक हा हिंदी आणि दाक्षिणात्त्य चित्रपट (Shwaas Marathi Movie Parshya) हे आवडीनं पाहतात त्याप्रमाणे मराठी चित्रपटही मनापासून एन्जॉय करत आहेत. 'सैराट' हे त्यातील आत्ताच उदाहरण. अशा एका आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक जीवनावर, आयुष्यावर भाष्य करणाऱ्या सिनेमानं अगदी ऑस्करपर्यंत झेप घेतली होती आणि हा चित्रपट होता 2004 साली आलेला श्वास.

या चित्रपटानं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि नामाकंनं मिळवली होती. आजही हा चित्रपट आवडीनं पाहिला जातो. श्वास चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे (Arun Nalawade) यांची भुमिका जेवढी लक्षात राहिली तेवढीच लक्षात राहिली ती म्हणजे या चित्रपटातील परश्या म्हणजे परशुराम याची. 

एका गंभीर आजारानं ग्रस्त असलेल्या या लहान मुलाची शारिरीक आणि मानसिक अवस्था या भुमिकेतून आपल्यासमोर वास्तवाच्या परीपटलातून समोर येते. अभिनेता अश्विन चितळे यानं ही भुमिका साकारलेली होती. या चित्रपटातून त्याला एक वेगळी ओळख प्राप्त झाली आणि या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुकही झाले होते. त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले त्याचसोबत राष्ट्रीय स्तरावरील सर्वात उच्च दर्जाचा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कारही त्याला मिळाला. आज श्वास हा चित्रपट प्रदर्शित होऊन 19 वर्षे झाली (Ashwin Chitale Latest Photo) आहेत. तेव्हा हा लहानगा परश्या आता मोठा झाला असून त्यानं इतरांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात आपलं करिअर निवडलं आहे. 

या चित्रपटाचा इम्पॅट हा आजही प्रेक्षकांवर कायम आहे. आजोबा आणि नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी ही गोड आणि तितकीच वास्तवदर्शी कथा आहे. अरूण नलावडे यांनी आजोबांची भुमिका साकारली होती आणि अश्विननं त्याच्या नातवाची. एका लहानश्या खेडेगावातून आलेले हे आजोबा आलल्या नातवाला घेऊन मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी घेऊन येतात. तेव्हा त्यांची भेट ही डॉ. साने यांच्याशी म्हणजेच संदीप कुलकर्णी यांच्याशी होती. मग परशुरामचा प्रवास आणि त्याचे ऑपरेशन मग त्यानंतरचं बदललं आयुष्य हे सर्व रूपेरी पडद्यावर पाहताना आपलंही मनं हे भावनिक होऊन जातं. हा थक्क करणारा प्रवास आपण सर्वांनीच अनुभवला आहे.

अनेक चित्रपटही गाजले

अरूण नलावडे हे आज अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून काम करताना दिसत आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की श्वास या चित्रपटातील अश्विन चितळे नक्की आता काय करतोय? परंतु आता अश्विन हा फार मोठा झाला असून तो आता 20 च्याही पुढे आहे. त्याला आता ओळखणंही कठीण झालं आहे. 

अश्विननं त्यानंतर बालकलाकार (Shwaas Child Artist Movies) म्हणून आहिस्ता आहिस्ता, टॅक्स नं 9211, आशाएं, देवराई अशा हिंदी - मराठी चित्रपटांतून उत्तम भुमिका केल्या आहेत. परंतु त्यानंतर तो कुठल्याच फारश्या चित्रपटांमधून दिसला नाही. आता तो पुर्ण वेळ काम करत नसून त्यानं एक करिअरचा एक वेगळा पायंडा निवडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय करतोय आज परश्या? 

अश्विन चितळे हा पुण्याचा आहे. त्यानं नूतन मराठी विद्यालयातून शालेय शिक्षण पुर्ण केले आहे. सर परशुरामभाऊ कॉलेजमधून त्यानं जिओग्राफी आणि फिलॉसॉफी मधून तर टिळक महाराष्ट्र महाविद्यालयातून इंडोलॉजी विषयाची डिग्री संपादन केली आहे. तो इन्टाग्रामवरही (Ashwin Chitale Instagram) सक्रिय आहे. त्यानं स्वत:चे अश्विन हेरीटेज टुर्स सुरू केलं आहे. तो यातून टुर्स प्लॅन करतो. तो फारसी भाषाही शिकतो आहे. त्याला सूफी आणि कवी रूमी यांच्या कवितांचेही वेड आहे. तो याचा अभ्यासही करतो आहे. इन्टाग्रामवरही तो या संदर्भात भाषांतर, शायऱ्या आणि कथाकथनाचे कार्यक्रम करतो.