`सरकार संकटात...`, `रानबाजार` फेम तेजस्वीनीचा `तो` व्हिडीओ पुन्हा चर्चेत
`झेंड्याचा रंग कुठलाही असला, तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा...`, `रानबाजार` मधील `तो` व्हिडीओ शेअर करण्यामागे तेजस्वीनीचा नेमता हेतू काय?
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. त्यामुळे पुढच्या क्षणात काय होईल याची कल्पना देखील कोणाला नाही. सध्या राजकारणातील तापलेलं वातावरण पाहून अनेक सेलिब्रिटींनी आक्रोश व्यक्त केला आहे. एकीकडे राज्यात राजकीय घडामोडी जोर धरत आहेत तर, दुसरीकडे अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या 'रानबाजार' मधील एका सीनने सर्वत्र खळबळ माजली आहे. तेजस्वीने सीरिजमधील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
राज्यातील राजकारणाची परिस्थिती पाहता तेजस्विनीने व्हिडीओ पोस्ट केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तेजस्विनीचा व्हिडीओ पूर्णपणे राजकीय घडामोडींवर आधारलेला आहे. तेजस्विनीने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक जण कमेंट करत आहेत.
'झेंड्याचा रंग कुठलाही असला, तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा...' व्हिडीओमधील संवादाकडे अनेकांचं लक्ष केंद्रीत झालं आहे. ''सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही.” तेजस्विनी पंडितने सध्या सुरु असलेलं राजकीय वातावरण पाहून हा व्हिडीओ शेअर केला असल्याचंच दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वत्र फक्त आणि फक्त 'रानबाजार' सीरिजची चर्चा होती. पण आता सरकारमध्ये सुरु असलेली उलथापालथ आणि तेजस्विनीने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, सुरुवातीला सीरिजला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण आता वेबसीरिजला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सीरिज पाहिल्यानंतर उत्तम वेबसीरिज असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहे.