मुंबई : यंदाच्या ईदला सलमान खान त्याच्या चाहत्यांना 'रेस 3'ची ईदी देणार आहे. बहुप्रतिक्षित 'रेस 3' हा सिनेमा येत्या 15 जूनला रीलिज होणार आहे. या चित्रपटाचं अ‍ॅडवान्स बुकिंगदेखील सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर कोणत्या स्वरूपात यश मिळतं? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.  


रीलिजपूर्वी मोडला 'दंगल' चा रेकॉर्ड  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रेस 3' या चित्रपटाचे रीलिज तोंडावर आले असतानाच या चित्रपटाच्या सेटॅलाईट राईट्सने मात्र दंगलवर मात केली आहे. सर्वाधिक किंमतीचा सॅटेलाईट राईट्ससाठी विकला जाणारा चित्रपट 'दंगल' होता. दंगलसाठी 75 कोटी मोजण्यात आले होते. मात्र आता 'रेस 3' च्या सॅटेलाईट राईट्साठी सुमारे 130 कोटी  मोजण्यात आले आहेत. यामुळे चित्रपट निर्मितीचा खर्च भरून निघाल्याची चर्चा आहे. 


रेस 3 ची तगडी स्टारकास्ट 


रेस 3 या चित्रपटामध्ये सलमान खान, जॅकलीन फर्नांडीज, डेजी शाह, साकिब सलीम, अनिल कपूर आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहेत. रेमो डिसुझाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रेस सीरीजमधला हा तिसरा भाग असल्याने या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.