प्रमोशनसाठी रेस ३ ची टीम डान्स दिवानेच्या सेटवर...
रेस ३ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान, बॉबी देओल, साकीब सलीम आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज आणि डेजी शहा स्टारर रेस ३ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.
अलिकडेच सिनेमाच्या प्रमोशनसाठी रेस ३ ची टीम माधुरी दीक्षितच्या टी.व्ही. रियालिटी शो डान्स दिवानेच्या सेटवर पोहचली. सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडीजने येथे बहारदार सादरीकरण केले.
शो मध्ये सलमान खान डेनिम शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. तर जॅकलिनने पिंक रंगाचा गाऊन परिधान केला होता तर डेजीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.
तर माधुरी काळ्या रंगाच्या साडीत अत्यंत सुरेख दिसत होती.